घरताज्या घडामोडीनारायण राणेंचे सिंधुदुर्गासाठी २००कोटी, तालुके जोडणार मिनीट्रेनने

नारायण राणेंचे सिंधुदुर्गासाठी २००कोटी, तालुके जोडणार मिनीट्रेनने

Subscribe

सिंधुदुर्गमध्ये २०० कोटीचे उद्योग ट्रेंनिग सेंटर उभारणार - नारायण राणे

सिंधुदुर्गमध्ये मिनिट्रेन सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री व अधिकाऱ्यांशी चर्चा करून मिनिट्रेनसाठी ट्रॅक तयार करण्याचा प्रस्तावही रेल्वेमंत्रालायला देण्यात आला आहे कणकवली ते नांदगाव, देवगड,मालवण ,वेंगुर्ला आणि पुन्हा कणकवली असा मिनीट्रेनसाठी ट्रॅक तयार करावं व मिनिट्रेन सुरू करावी त्यामुळे पर्यटन विकसाला चालना मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दर्शन होणार आहे. मालवाहतूकही करता येणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी खूप संकल्पना असून लोकांनी सहकार्य केल्यास त्या टप्पा टप्याने अंमलात आणणार आहे अशी माहिती केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेप्रमाणे जनआशीर्वाद यात्रेसाठी कोकणात येत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना विविध प्रक्रिया उद्योग व्यवसाय करता यावे यासाठी सिंधुदुर्गात २० एकर जागेत २०० कोटीचे उद्योग ट्रेंनिग सेंटर उभारण्यात येणार आहे. व ट्रेनिग घेतल्यानंतर उद्योग सुरु करण्यासाठी अर्थसहाय्यही दिले जाणार आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सचित्र माहिती असणारी विशेष ट्रेन व सिंधुदुर्गमध्ये मिनी ट्रेन सुरू करण्याच्या मागणीचा प्रस्ताव ही रेल्वे मत्र्यांना देण्यात आल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

- Advertisement -

नवी दिल्लीतील अकबर रोड -२८ येथील केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या शासकीय निवासस्थानी सिंधुदुर्ग मधील पत्रकारांनी त्यांची भेट घेतली .त्यावेळी जिल्ह्यातील विकासावर चर्चा केली यावेळी त्यांनी जिल्ह्यासाठी खूप काही करायचं आहे असे सांगत विकासाच्या संकल्पना सांगितल्या. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायाला फार मोठी संधी आहे. येथील बेरोजगार तरुणांनी उद्योग व्यवसाय करण्यासाठी पुढे आले पाहीजे. बांबू पासून अनेक वस्तू बनवल्या जातात कोकणात बांबूची चिंचेची झाडे खूप आहेत. चिंचेच्या बियापासून पावडर बनवून त्यापासून रंगांची निर्मिती होते. असे अनेक प्रकिया उद्योग सुरू करता येणे शक्य आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० एकर जागेत २०० कोटीचे ट्रेंनिग सेंटर उभारले जाणार आहे आणि ट्रेंनिग घेतलेल्या लोकांना खादी ग्रामोद्योग मार्फत सबसीडीवर अर्थसहाय्य केले जाणार आहे अशी माहिती देण्यात आली तसेच उद्योग व्यवसायातील इतर देशाचे टेक्निक आपल्या देशात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची एक टीम चीन व इतर देशात पाठविली जाणार अशीही माहिती दिली. पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर तसेच इतर ठिकाणी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सचित्र माहिती असणारी विशेष रेल्वे सुरू करण्यासाठो रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच कोकण रेल्वेच्या मार्गावर दुतर्फा नारळाची झाडे लावण्याची मागणी सुद्धा केली आहे

- Advertisement -

हेही वाचा : संजय राऊतांच्या टीकेवर कपिल पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले शिवसेनेच्या रॅलीत…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -