घरमनोरंजनराखी सावंतचा नवा अवतार, 'स्पायडर वुमन' बनून बिग बॉसच्या घराबाहेर घातला गोंधळ...

राखी सावंतचा नवा अवतार, ‘स्पायडर वुमन’ बनून बिग बॉसच्या घराबाहेर घातला गोंधळ !

Subscribe

राखी सावंत स्पायडर वुमनचा वेश परिधान करुन बिग बॉसच्या घरासमोर येऊन चित्र- विचित्र पोज देताना दिसत आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (rakhi sawant)दिवसागणिक चाहत्यांमध्ये अधिक लोकप्रिय होताना दिसत आहे. बिग बॉसच्या (bigg boss)घरातून आल्यानंतर राखी सतत लाईम लाईटमध्ये असते. तसेच अनेकदा राखी पॅपराजी समोर मस्ती -मज्जा करताना दिसते. नुकतच राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरला होत आहे. राखी सावंत स्पायडर वुमनचा (rakhi sawant spiderman) वेश परिधान करुन बिग बॉसच्या घरासमोर येऊन चित्र- विचित्र पोज देताना दिसत आहे. राखीच्या या अवताराची अनेकांनी खिल्ली उडवली तर काहिंनी तिचे मीम्स व्हायरल करण्यास सुरूवात केली.(rakhi sawant arrives at bigg boss ott house in spider man costume)

व्हायरल व्हिडिओमध्ये राखी गादीवर झोपून जोर-जोरात ओरडत आहे. तसेच ती बिग बॉसकडे तिला घरात बोलवा अशी मागणी करत आहे. “बिग बॉस मुझे बुला लो बिग बॉस.आपने मुझसे वादा किया था.” अशा घोषणा करत आहे. राखीच्या या व्हिडिओची चर्चा सध्या सोशल मीडियावर तुफान रंगत आहे. राखीने स्पाडरमॅन सारखा लूक केला असून गळ्यात भली मोठी नकली गोल्ड चैन घातली आहे. तसेच तिच्या सोबत एक सांऊड आणि स्पायडर मॅनचे चित्र असलेली एक सूटकेस  देखील दिसून येत आहे. राखीने जोरजोरात गाणे वाजवत स्पायडर मॅनची नक्कल करताना दिसत आहे.

- Advertisement -

व्हिडिओ पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

राखी सावंत बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती. बिग बॉसच्या घरात राखीने प्रचंड ड्रामा केला होता. सिझनच्या शेवटच्या घटकाला राखी 14 लाख रुपयांची बॅग घेऊन शोमधून बाहेर पडली.


हे हि वाचा- Yeu KashiTashi Me Nandayla: स्वीटू आणि ओमची लग्नघटिका समीप

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -