घरताज्या घडामोडीतुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप : मला भेटू नका - ज्योती देवरेंवर अण्णा संतापले

तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप : मला भेटू नका – ज्योती देवरेंवर अण्णा संतापले

Subscribe

आमदार लंकेंपाठोपाठ ज्योती देवरे गेल्या होत्या अण्णा हजारेंच्या दारी

आमदार निलेश लंके यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्याविरोधातील तक्रारी, त्याअनुषंगाने झालेल्या चौकशीत आढळून आलेले तथ्य यासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शनिवारी अवगत केले होते. त्यावेळी असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नको अशी भुमिका अण्णा हजारे यांनी घेतली होती. या पार्श्‍वभुमिवर रक्षाबंधनाचे औचित्य साधून हजारे यांच्याकडे पोहचलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांना ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांनी चांगलेच झापलं आहे.

अण्णा हजारे यांच्याकडे रडत गेलेल्या देवरे यांना उद्देशुन हजारे म्हणाले, तुम्ही मला भेटू नका, तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. चौकशीत ते सिध्दही झाले आहेत. चारित्र शुध्द ठेवा, अपमान गिळण्याची तयारी ठेवा. पारनेरचे लोकप्रतिनिधी अतिशय चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामामुळे तालुक्याचे नाव जगात पोहचले आहे. त्यांच्यावर आरोप करताना थोडातरी विचार करायला हवा होता. तुमच्या स्वभावात बदल करा असे अण्णा हजारे यांनी तहसीलदार देवरे यांना म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान अण्णा हजारे पुढे म्हणाले की, तुमच्या स्वार्थासाठी आमदार निलेश लंके यांच्यासारख्या तरूणाची राजकिय कारकिर्द खराब करू नका. तुमच्याविरोधात भ्रष्ट्राचाराचे आरोप आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने तसा अहवाल दिला आहे. असे सांगत हजारे यांनी तहसिलदार देवरे यांना चांगलेच झापले. मला भेटण्यासाठी येऊ नका असे हजारे सांगत असताना देवरे या अण्णा मला एकदा तरी राखी बांधू द्या अशी विनवणी करीत होत्या.

तीन तास ताटकळत थांबूनही अण्णा भेटलेच नाहीत !

अण्णा हजारे यांनी झापल्यानंतर देवरे खोलीबाहेर आल्या. हजारे यांच्यासोबत भेट घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेकांना फोन केले. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने कोणीही देवरे यांची वकिली करण्यास धजावले नाही. अखेर तीन तासानंतर निराश देवरे पारनेरकडे रावाना झाल्या. अखेर अण्णा हजारेंची भेट झाली नाही.

- Advertisement -

ज्योती देवरेंचा आत्महत्येचा इशारा

पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लीप तयार करुन आत्महत्येचा इशारा दिलाय. ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लीपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. शासकीय कामात लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत होणारा त्रास आणि वरिष्ठांचे कामातील दुर्लक्ष याबाबत ज्योती देवरेंनी आपली व्यथा मांडली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यामार्फत कशाप्रकारे त्रास दिला जात आहे. मानसिक खच्चीकरण आणि धमकी देणे अशा अनेक घटनांबाबत ज्योती देवरे यांनी खुलासा केला आहे.


हेही वाचा :  ज्योती देवरेंच्या समर्थनार्थ तहसीलदार संघटना मैदानात, सोमवारी राज्यव्यापी आंदोलन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -