घरताज्या घडामोडीSting Operation : तब्बल ८९७२ मुंबईकरांना महापालिकेची नोटीस

Sting Operation : तब्बल ८९७२ मुंबईकरांना महापालिकेची नोटीस

Subscribe

मुंबईत covid-19 चा संसर्ग सुरू असतानाच दरम्यानच्या कालावधीत मुंबईत महापालिकेने जवळपास ४७ हजार डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत जवळपास ८ हजार ९७२ मुंबईकरांना नो टीसही पाठवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेकडून जवळपास ८० लाख संभाव्य डास उत्पत्तीच्या ठिकणांचा शोध घेतला गेला. त्यामध्ये ४७ हजार ठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळली. महापालिकेने कारवाई करत ही ठिकाणे हटवलीही. मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नोटीशीत बहुतांश ठिकाणे ही उच्चभ्रू वस्तीतील आहेत. त्यामध्ये झाडांच्या कुंड्या तसेच रेफ्रिजेरेटर पॉटमध्ये ही डासांच्या उत्पत्तीची ठिकाणी बहुतांशपणे आढळली आहेत.

गेल्या वर्षीच्या म्हणजे २०२० च्या आकडेवारीनुसार डेग्यूंच्या ८० टक्के रूग्णांच्या घरातच किंवा घरानजीकच या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळले आहे. स्वच्छ साठवलेल्या पाण्यात किंवा स्थिर पाण्यात साधारणपणे डेग्युंचे डास आढळतात. साधारणपणे रोपट्यांमध्ये जी शोभेची रोपटी असतात, अशा ठिकाणी फेंग शुई, बांबू आणि मनी प्लान्ट यासारख्या झाडात हे डेंग्यूचे डास आढळतात. त्यासोबतच एअर कंडिश्नर सिस्टिम, रेफ्रिजेरेटर ट्रे मध्येही डासाच्या उत्पत्तीची स्थाने आहेत. यंदाच्या वर्षी १४ ऑगस्टपर्यंत ९८७२ मुंबईकरांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अनेक मुंबईकरांच्या घरात साठवलेल्या पाण्यातच ही डासांची उत्पत्ती आढळली आहे.

- Advertisement -

गतवर्षीच्या तुलनेत केसेस यंदा कमी

यंदाच्या वर्षात एकट्या जुलै महिन्यातच ५५७ डेंग्यूच्या केसेस महापालिका क्षेत्रात आढळल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्के डेंग्यूच्या केसेस आढळल्या आहेत. गेल्या वर्षी जुलै २०२० मध्ये याच कालावधीत डेंग्यूच्या ९५४ केसेस आढळल्या होत्या. कोरोनाच्या काळात मुंबई महापालिका क्षेत्रात डासांची उत्पत्ती शोधण्यासाठी मुंबई महापालिकेकडून १५०० कामगारांची टीम तैनात करण्यात आली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवण्याची जबाबदारी या टीमवर आहे.


हे ही वाचा – हेअरबँडमधून सोन्याची तस्करी, मंगळुरु विमानतळावर एकाला अटक

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -