घरताज्या घडामोडीपनवेलमध्ये नारायण राणेंच्या अटकेचा जल्लोष

पनवेलमध्ये नारायण राणेंच्या अटकेचा जल्लोष

Subscribe

शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला आहे.

केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी महाडच्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. या विधानाने शिवसैनिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेताच पोलिसांनी राणे यांना चिपळूनहून अटक केली. राणेंना अटक केल्याचे जाहीर होताच. पनवेलमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केला.यामुळे मुंबई,चिपळून, नाशिक रायगडसह संपूर्ण राज्यभर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. राज्यभर शिवसेनेकडून निषेध करीत अटक करण्याची मागणी करण्यात आली.अखेर नारायण राणे यांना चिपळून पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली. राणे यांना अटक करण्यात आली तेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यकर्त्यांचा विरोध मोडून काढत पोलिसांनी अखेर नारायण राणे यांना अटक केली.

- Advertisement -

पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केल्याची बातमी येताच पनवेलसह अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी जल्लोष केला. पनवेलमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. तर नवीन पनवेलमध्येही मिठाई वाटण्यात आली. खारघरमध्ये पेढे वाटण्यात आले. पंतप्रधानांनी राणेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. नारायण राणेंनी केंद्रिय मंत्रीपद दिले आणि अख्ख्या कोकणामध्ये भयाण पाऊस पडला. महाड,चिपळूनमध्ये जी परिस्थिती उद्भवली हे नारायण राणे यांचे पायगुण आहेत. असा माणूस केंद्राने मंत्री केला त्याचा आम्ही निषेध करतो, असे सेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी म्हटले.

- Advertisement -

 


हेही वाचा – रायगड पोलिस नारायण राणेंना घेऊन महाडला रवाना, संगमेश्वर पोलिसांकडून घेतला ताबा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -