घरताज्या घडामोडीराणेंना झटका ! जन आशीर्वाद यात्रेत अनुभवली 'शॉक ट्रिटमेंट'

राणेंना झटका ! जन आशीर्वाद यात्रेत अनुभवली ‘शॉक ट्रिटमेंट’

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन आशीर्वाद यात्रे दरम्यान विजेचा शॉक बसल्याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. भर पावसामध्ये सुरू असणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेत राणे कणकवलीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी केलेल्या रोषणाईचा शॉक राणेंना शुक्रवारी बसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या शॉकमुळे राणेंचा झटका बसल्यानंतरची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे. राणेंना शॉक बसताच त्यांच्या पाठोपाठ असणारे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही वेळीच सावध झाले. त्यामुळे त्यांना शॉक लागण्याची घटना टळली.

नारायण राणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी स्टेजवर चढताना हा शॉक लागण्याचा प्रसंग घडला. नारायण राणे हे भर पावसात कणकवलीत जन आशीर्वाद यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सभोवताली फुलांच्या हाराची तसेच इलेक्ट्रिक रोषणाई करण्यात आली होती. त्याचवेळी रिमझिम पाऊसही सुरू होता. या रोषणाईला लावलेल्या झेंडूच्या फुलांच्या माळा पावलसाने भिजल्या होत्या. तसेच या माळांसोबतच इलेक्ट्रिक रोषणाई करण्यात आली होती. या फुलांच्या माळेला राणेंचा हात लागताच जोरदार असा इलेक्ट्रिसिटीचा झटका राणेंना बसला. त्यामुळे शॉक लागताच राणेंनी पटकन आपला हात झटकला. राणेंच्या या अनुभवाने त्यांच्या पाठोपाठ असणारे प्रवीण दरेकरही वेळीच सावध झाले. त्यांचा हातही त्या फुलांच्या माळेला लागणार होता. पण राणेंना शॉक लागल्याचे कळताच त्यांनी तत्काळ आपला हात मागे घेतला.

- Advertisement -

राणेंनी आपल्या हाताला शॉक लागल्याचे सोबतच्या सहकाऱ्यांना लक्षात आणून दिले. त्यावेळी राणेंनी इतरांनाही सावध केले. या हाराला शॉक लागत असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना सावध केले. त्यामुळे त्या शॉक लागणाऱ्या ठिकाणी दुरूस्ती करून घ्या, असेही राणेंनी त्यावेळी सोबतच्या कार्यकर्त्यांना सांगितले. या अनुभवानंतर राणे सावध झाल्याने त्यांनी हार घालायला जातेवेळी कोणताही आधार घेतला नाही. राणे कुठलाही आधार न घेता तसेच कुठेही स्पर्श न करता त्याठिकाणी पोहचले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी हार अर्पण केला.


हे ही वाचा – जन आशीर्वाद यात्रेतील गर्दी भोवली, सिंधुदुर्गात भाजप – सेना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -