घरमनोरंजनबीग बींच्या नातवाची झाली बॉलिवूडमध्ये एंट्री, झोया अख्तर सोबत करणार काम

बीग बींच्या नातवाची झाली बॉलिवूडमध्ये एंट्री, झोया अख्तर सोबत करणार काम

Subscribe

झोयाच्या 'आर्ची' या सिनेमात अनेक स्टारकिड्स झळकणार आहेत.

बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शिका झोया अख्तर(Zoya Akhtar) ‘आर्ची ‘(Archie)या आंतरराष्ट्रीय कॉमिक बुकच्या भारतीय रुपांतरणावर सिनेमा बनवणार असल्याचे झोयाने घोषित केले आहे. तसेच हा सिनेमा ओटीटी (OTT)प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय मेकर्सने घेतला आहे. या बहुचर्चित सिनेमात शाहरुख खानची(shahrukh khan) लेक म्हणजेच सुहाना खानला(Suhana khan) कास्ट करण्यात आले असल्याची माहिती झोयाने यापुर्वीच दिली आहे. आता या सिनेमामध्ये अगस्त नंदा ( agastya nanda)आणि खुशी कपूर (Khushi kapoor)यांची वर्णी लागली असल्याचे कळतेय.(amitabh bachchan grandson agastya nanda new movie)

झोयाच्या ‘आर्ची’ या सिनेमात अनेक स्टारकिड्स झळकणार आहेत. प्रसिद्ध फिल्ममेकर बोनी कपूर(Boney Kapoor) यांची मुलगी खुशी कपूर आणि महानायक अमिताभ बच्चन(Amitabh bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा देखील चित्रपटात पदार्पण करणार आहे. सिनेमाच्या पुढील तयारीसाठी अगस्त्य आणि खुशीला रिहर्सल करताना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.

- Advertisement -

अगस्त्यला अभिनय क्षेत्रात करियर करायचे असल्यामुळे त्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर थेट बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे दिसतेय. आर्ची हा सिनेमा कसा असणार आहे याबाबत अद्याप काही माहिती उघड झाली नसून सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिनेमा मैत्रीवर आधारित आहे. तसेच या सिनेमात काम करण्यासाठी झोया नवे चेहरे शोधत आहे. मात्र या सिनेमात कोणाची एंट्री होणार आहे याबाबत अद्याप कोणतीही अधीकृत माहिती कलाकारांकडून तसेच सिनेमाच्या मेकर्सतर्फे देण्यात आली नाहीये.


हे हि वाचा – तब्येत ठिक नसल्याचे कारण देत हनी सिंगने कोर्टात मारली दांडी

- Advertisement -

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -