घरताज्या घडामोडीतालिबान्यांची क्रूरता! समलैंगिक तरुणावर बलात्कार, विरोध केल्याने दिली शिक्षा

तालिबान्यांची क्रूरता! समलैंगिक तरुणावर बलात्कार, विरोध केल्याने दिली शिक्षा

Subscribe

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा करून १५ दिवस उलटून गेले आहेत. १५ ऑगस्टला तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला आणि सर्वत्र त्यांची दहशत पसरली. त्यामुळे अफगाण लोकं जीवाची परवा न करता देश सोडून जाताना दिसले. तालिबान्यांनी दिलेल्या डेडलाईननुसार सोमवारी उशीरा रात्री अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले. पण त्यानंतरपासून तालिबान्यांनी आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली. तालिबानी किती क्रूर असून शकतात, यासंदर्भातील अनेक बातम्या समोर आल्या आहेत. आता तालिबान्यांनी एका समलैंगिक तरुणावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अमेरिकेने जेव्हापासून आपले सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेतले आहे, तेव्हापासून अफगाण महिला घाबरल्या आहेत. त्याचप्रमाणे एलजीबीटीक्यू समाजावर देखील तालिबान्यांची दहशत पसरली आहे. यादरम्यानच डेली मेलने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, दोन तालिबान्यांनी एका समलैंगिक तरुणावर बलात्कार केला आणि त्याला मारहाण केली.

- Advertisement -

तालिबान्यांना हा व्यक्ती समलैंगिक असल्याचे समजले होते. त्यानंतर तालिबान्यांनी त्याच्यासोबत मैत्रीचे लालच दाखवले. तसेच काबूलमध्ये सुरक्षित ठिकाणी नेणार असे सांगितले. शिवाय त्याला देशातून बाहेर जाण्याचा सुरक्षित रस्ता दाखवू असे देखील सांगितले होते. पण त्यानंतर तालिबान्यांनी समलैंगिक तरुणांवर बलात्कार केला आणि त्यांच्या वडिलांचा मोबाईल नंबर घेतला. जेणेकरून त्याचा वडिलांना सांगू शकले की, त्यांचा मुलगा गे आहे.


हेही वाचा – Afghanistan: NIAच्या रडारवर २५ भारतीय, ज्यांचे कनेक्शन दहशतवादी संघटना ISISसोबत!

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -