घरमनोरंजनsidharth shukla-सिद्धार्थची आईबरोबर होती स्पेशल बॉंडींग

sidharth shukla-सिद्धार्थची आईबरोबर होती स्पेशल बॉंडींग

Subscribe

सिद्धार्थ लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.

बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झालं आहे (siddharth shukla death). हृदयविकाराच्या झटक्यामुळे सिद्धार्थने वयाच्या ४०व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. या घटनेनंतर संपूर्ण मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे. सिद्धार्थ गेल्या अनेक दशकापासून मनोरंजन सृष्टीत काम करत असून बिग बॉसच्या 13 व्या सिझन दरम्यान सिद्धार्थच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती. सिद्धार्थच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास सिद्धार्थ एकूलता एक मुलगा असून त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत. तसेच सिद्धार्थ आईचा अत्यंत लाडका होता. तो आपल्या आईलाच हिरो मानत असे.(bigg boss fame sidharth shukla was close to her mother)

सिद्धार्थ लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. लंग डिसऑर्डमुळे सिद्धार्थच्या वडिलांचे निधन झाले असल्याचे कळतेय.

- Advertisement -


सिद्धार्थच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियावर दुखाचे डोंगर कोसळले आहे. तसेच सिद्धार्थच्या आईला प्रचंड मोठ्ठा धक्का बसला असून आपल्या लाडक्या मुलाने जगाचा निरोप घेतला आहे यावर त्यांचा अजुनही विश्वास बसत नाहिये.

सिद्धार्थ अनेकदा त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या आईसोबत फोटो शेअर करत असे. तसेच तो नेहमीच आपल्या आईची विशेष काळजी  घेत असे.

- Advertisement -


बिग बॉसच्या घरात असताना फॅमिली विक दरम्यान सिद्धार्थची आई त्याला भेटण्यास आली असता सिद्धार्थ यादरम्यान अत्यंत भावूक झाल्याचे दिसून आले होते. तसेच त्यांची जवळीक ,प्रेम पाहून चाहते देखील भारावून गेले होते.

बिग बॉस फॅमिली विक एपिसोड दरम्यान सिद्धार्थच्या आईने त्याला शॉर्ट्स घालण्यावरुन देखील ओरडले होते. तसेच त्याला रागावर नियंत्रण करण्याचा सल्ला दिला होता.


हे हि वाचा – siddharth shukla death: सिद्धार्थच्या आकस्मिक मृत्यूने मैत्रीण शहनाज गिलला मानसिक धक्का

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -