घरताज्या घडामोडीSidharth Shukla death-सिद्धार्थच्या मृत्यूचं गूढ वाढलं,पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट

Sidharth Shukla death-सिद्धार्थच्या मृत्यूचं गूढ वाढलं,पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट

Subscribe

सिद्धार्थच्या पोस्टमार्टममध्ये प्राथमिकदृष्य्टया सिद्धार्थचा मृत्यू अनैसर्गिक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बिग बॉस सीजन १३ चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पण फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थला हृदयविकाराच्या झटका येऊ शकतो यावर त्याच्या निकटवर्तियांसह चाहत्यांनीही शंका व्यक्त केली . यामुळे त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टकडे सगळ्यांचेच लक्ष लागून होते. आज कूपर हॉस्पीटलने सिद्धार्थचा पोस्टमार्टम रिपोर्ट मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. त्यात पोस्टमार्टममध्ये प्राथमिकदृष्य्टया सिद्धार्थचा मृत्यू अनैसर्गिक झाल्याचे दिसत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच केमिकल अॅनालिसिस आणि हिस्टोपॅथोलॉजी रिपोर्टसाठी त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचे त्यात सांगण्यात आले आहे. या दोन रिपोर्टमधूनच सिद्धार्थच्या मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे.

सिद्धार्थने बुधवारी रात्री गोळ्या घेतल्या होत्या. पण त्या त्याने कशासाठी घेतल्या. हे मात्र स्पष्ट झालेले नाही. यामुळे त्याच्या व्हिसेरातून त्याने ड्रग्ज घेतले होते की त्यावर विषप्रयोग करण्यात आला आहे हे समजणार आहे.

- Advertisement -

काय आहे हिस्टोपॅथोलॉजी?

रक्तातील कोशिका आणि टिश्यूंवर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर टिश्यू तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात. त्यात संबंधित व्यक्तीच्या आजाराचे निदान होते. तसेच त्याने कोणत्या औषधांचे सेवन केले होते. ते ही कळते.

- Advertisement -

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -