घरक्रीडाइन्स्टाग्रामवरही विराट सुसाट; १५० मिलियन झाले फॉलोअर्स

इन्स्टाग्रामवरही विराट सुसाट; १५० मिलियन झाले फॉलोअर्स

Subscribe

फिटनेस, क्रिकेट आणि धावा काढण्याची भूक यामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभरात करोडो चाहते आहेत. जरी गेल्या दोन वर्षात कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक केले नसले तरीही त्याचे चाहते कमी झाले नाहीत. आज इन्स्टाग्रामवर भारतीय संघाचा कर्णधार विराटचे १५० मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. या टप्प्यापर्यंत पोहोचणार आशियाईमधला पहिला सेलिब्रिटी ठरला आहे. (Virat Kohli becomes 1st Indian to reach 150mn followers on Instagram)

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

इन्स्टाग्रामवर १५० मिलियन फॉलोअर्सपर्यंत पोहोचणार कोहली जगातला पहिला क्रिकेटर ठरला आहे. दुसरीकडे, जर आपण संपूर्ण क्रीडा विश्वाकडे पाहिले तर कोहली आता चौथ्या क्रमांकावर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

- Advertisement -

विराट कोहलीने गुरुवारी इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटीत दमदार कामगिरी केली आहे. विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २३००० धावा ४९० डावांमध्ये करणारा खेळाडू बनला आहे. विराटने यामध्ये सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंगसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. ओव्हल कसोटीच्या पहिल्याच दिवशी विराटने मोठे यश मिळवले आहे.

विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पराक्रम करणारा तिसरा आणि एकूण सातवा क्रिकेटपटू ठरला आहे. विराटने ४९० डावांमध्ये ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. यापूर्वी सचिनने ५२२ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. भारतीय कर्णधाराने वनडेमध्ये १२१६९* धावा, टी -२० मध्ये ३१५९* आणि कसोटीत ७६७५* धावा केल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ENG VS IND TEST 4TH : कसोटी सामन्यात ‘जार्वो ६९’ पुन्हा मैदानात


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -