घरक्रीडाENG VS IND TEST 4TH : कसोटी सामन्यात ‘जार्वो ६९’ पुन्हा मैदानात

ENG VS IND TEST 4TH : कसोटी सामन्यात ‘जार्वो ६९’ पुन्हा मैदानात

Subscribe

ओवलच्या मैदानात ही दिसला जार्वो ६९

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सध्या ओवल येथे सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजी दरम्यान डॅनियल जार्विस उर्फ ‘जार्वो ६९’ (Jarvo 69) हा पुन्हा एकदा मैदानात पळत आला. ही घटना भारताचा गोलंदाज उमेश यादव गोलंदाजी करताना घडली. मैदाना बाहेरुन खेळाडूंच्या दिशेने ‘जार्वो ६९’ मैदानात घुसला. त्याने जॉनी बेयरस्टो ला टक्कर दिली. त्यानंतर त्याला सुरक्षारक्षकांनी खेचून मैदानाबाहेर काढले. त्या वेळी खेळ काही मिनीटं थांबवण्यात आला.

‘जार्वो ६९’ चा व्हीडीओ ट्वीटरवर मोठ्याप्रमाणावर ट्रेंड होत आहे. ‘जार्वो ६९’ चे हे नाट्य इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात घडले.

- Advertisement -

 

- Advertisement -

इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा ५४ धावांवर चौथा तर ६२ धावांवर पाचवा गडी बाद केला आहे. सध्या इंग्लंडचा फलंदाज पोप – ६६ चेंडूत ३८ धावा आणि जॉनी बेयरस्टो – ६३ चेंडूत ३४ धावा करत मैदानावर खेळत आहेत. इंग्लड संघ पाच बाद १३९* धावांवर खेळत आहे.

भारतीय संघाला इंग्लंड संघाकडुन आघाडी रोखायची असेल तर भारताला पुढच्या पाच विकेट्स अवघ्या ५२ धावांवर मिळवाव्या लागतील. चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची दोन सत्र अजुनही शिल्लक आहेत. भारतीय गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करणार या कडे सर्वांचेच लक्ष आहे.


हेही वाचा : Cristiano Ronaldo Football : रोनाल्डो पुन्हा सात क्रमांकाच्या जर्सीत

Tokyo Paralympics: अवनी लेखराने रचला इतिहास, सुवर्णपदकानंतर कांस्य पदकाची कमाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -