घरक्रीडाTokyo Paralympic : बॅटमिंटनपटू प्रमोद भगतची सुवर्ण कामगिरी, पॅरालिम्पिकमध्ये भारताला चौथं सुवर्ण

Tokyo Paralympic : बॅटमिंटनपटू प्रमोद भगतची सुवर्ण कामगिरी, पॅरालिम्पिकमध्ये भारताला चौथं सुवर्ण

Subscribe

भारतीय बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने (Pramod Bhagat) टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. शनिवारी त्याने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीच्या SL3 फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनच्या जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांकावर असलेल्या डॅनियल बेथेलचा २१-१४, २१-१७ असा पराभव केला. यासह, ३३ वर्षीय प्रमोद भगत पॅरालिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय बॅटमिंटनपटू बनला आहे.

प्रमोद भगतने उपांत्य फेरीत जपानच्या फुजीहाराचा २-० असा पराभव केला. प्रमोद भगतने उपांत्य फेरीचा सामना २१-११, २१-१६ असा जिंकला. दरम्यान, अंतिम सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. यामुळे आता टौकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात चौर सुवर्ण झाले आहेत. तर एकूण पदकांची संख्या ही १७ झाली आहे.

- Advertisement -

मनोजची कांस्य पदकाची कमाई

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची अप्रतिम कामगिरी सुरुच आहे. नुकतंच भारताच्या प्रमोद भगत आणि मनोज सरकार यांनी डबल धमाका करत SL3 स्पर्धेत भारताला दोन पदकं मिळवून दिली. प्रमोदने सुवर्ण तर मनोजने कांस्य पदकावर नाव कोरलं.

- Advertisement -

मनोज सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाला. मात्र तरीदेखील तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात त्याने पुनरागमन करत दमदार खेळ दाखवला. तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात त्याने विजय मिळवत कांस्य पदक जिकंलं आहे. त्याने जपानच्या दायसुके फुजिहाराला मात देत कांस्य पदक मिळवलं.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -