घरमहाराष्ट्रनाशिकगणेश मंडळांना परवानगीसाठी एक खिडकी योजना

गणेश मंडळांना परवानगीसाठी एक खिडकी योजना

Subscribe

गणेश मंडळांना पोलीस आयुक्तालय व नाशिक महापालिकेतर्फे एक खिडकी योजनेमार्फत परवानगी दिली जाणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करताना सार्वजनिक गणेश मंडळांना पोलीस आयुक्तालय व नाशिक महापालिकेतर्फे एक खिडकी योजनेमार्फत सर्व परवानगी दिली जाणार आहे. ४ फूट उंचीच्या गणेशमूर्तीस पोलिसांची परवानगी असेल. देखावे साकारताना हेल्मेट जनजागृती व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, अशी सूचना पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केल्याची माहिती गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष समीर शेटे यांनी दिली.

सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असली तरी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सवावर आर्थिक निर्बंध लावण्यात आले आहेत. निर्बंध शिथील करण्यासह मागण्या मान्य कराव्यात, यासाठी शुक्रवारी नाशिक गणेशोत्सव महामंडळ पदाधिकार्‍यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी माजी महापौर विनायक पांडे, समीर शेटे सत्यम खंडाळे, रामसिंग बावली, हेमंत जगताप, प्रथमेश गिते, कुणाल मगर, बबलू परदेशी उपस्थित होते.

मंडप उभारणीसाठी आवश्यक परवानगी घेण्यासाठी प्रतिमंडळ ८८६ रुपये व जाहिरातीचा प्रतिफलक ७५० रुपये शुल्क आकारणी नाशिक महापालिकेने रद्द करावी. या मागणीसाठी सोमवारी (दि.६) महापालिकेत बैठक होणार आहे. यात शुल्काबाबत निर्णय होईल.- समीर शेटे, अध्यक्ष, गणेशोत्सव महामंडळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -