घरताज्या घडामोडीकोण आहेत करुणा शर्मा ? धनंजय मुंडेशी काय आहे कनेक्शन?

कोण आहेत करुणा शर्मा ? धनंजय मुंडेशी काय आहे कनेक्शन?

Subscribe

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरु्दध पुरावे देण्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल सापडली. यामुळे परळीत त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून करुणा शर्मा नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

कोण आहेत करुणा शर्मा

- Advertisement -

जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राजकीय वर्तृळात खळबळ उडाली. रेणू शर्मा हीने थेट मुंबई पोलीस आयुक्तांकडे ही तक्रार केली. एवढंच नव्हे तर तक्रारीच्या प्रतीचा फोटोही तिने टि्वट केला होता.

याप्रकारामुळे मुंडे अडचणीत आले होते. कारण रेणू शर्मा हीने तक्रारीत धनंजय मुंडे यांच्याशी पहीली भेट मध्य प्रदेशातील इंदौर येथे बहीण करुणा शर्मा हीच्या घरी झाल्याचे म्हटले होते. तसेच मुंडे यांनी माझी बहीण करुणा शर्मा हीच्याबरोबर १९९८ मध्ये प्रेमविवाह केल्याचा गौप्यस्फोटही रेणू शर्माने केला. त्याचबरोबर मुंडेनी आपल्यावर बलात्कार केल्याचंही तिने तक्रारीत म्हटल होतं. रेणू शर्मा प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांची राज्यात पुरती नाचक्की झाली. विरोधकांनी याच मुद्द्यावरून मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला होता.

- Advertisement -

यामुळे नंतर मुंडे यांनी करुणा शर्माबरोबर विवाह केल्याची कबुली दिली. तसेच त्यांना दोन मुलं असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंडेच्या या छुप्या लग्नाच्या बातमीने महाराष्ट्रात खळबळ उडाली.

त्यानंतर मुंडे यांनी करुणा शर्मा, रेणू शर्मा आणि त्यांचा भाऊ आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे सांगितले. तसेच करुणा शर्मा यांच्याविरोधातील दावा न्यायालयात प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

त्यानंतर रेणू शर्मा हीने मुंडेविरोधातील तक्रारही मागे घेतली. यामुळे रेणू शर्मा आणि करुणा शर्मा विषय़ संपला होता. मात्र काल करुणा शर्माने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत मुंडेची पोलखोल करणार असल्याचा दावा केल्याने महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा तापलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -