घरसणवारGaneshotsav 2021 : गणेश चतुर्थीला 'या' सोप्प्या मनमोहक, आकर्षक रांगोळ्यांनी करा बाप्पाचं...

Ganeshotsav 2021 : गणेश चतुर्थीला ‘या’ सोप्प्या मनमोहक, आकर्षक रांगोळ्यांनी करा बाप्पाचं स्वागत

Subscribe

Ganeshotsav 2019 Rangoli Designs: आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेत. यानिमित्ताने पुढील दहा दिवस, मुंबईसह देशभरात बाप्पाच्या आगमनाची धूम पाहायला मिळेल. सर्वांचे लाडके बाप्पा आता घरोघरी, गल्लोगल्ली दीड , पाच आणि सात दिवसांसाठी विराजमान होतील. बाप्पाच्या आगमनासाठी खास पदार्थ आणि रांगोळ्या काढल्या जातात. गणपती बाप्पाच्या धूमधाममध्ये आपण मनमोहक, आकर्षक रांगोळ्या काढून  या सणाचा उत्साह वाढवू शकता. कारण रांगोळी (Rangoli) ही केवळ सुशोभीकरणाचेच नाही तर समृद्धीचे देखील प्रतीक मानले जाते. (Ganesh Chaturthi Rangoli Images) सजावटीबरोबरचं देवाजवळ काढलेली सुंदर मनमोहक रांगोळीतील नाजूक नक्षीने आणि रंगसंगतीने सारे वातावरण प्रसन्न करते. त्यामुळे यंदाही गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची प्रतिकृती व काही सोप्प्या वेल-फुलांच्या रांगोळ्या काढून अनोख्या अंदाजात बाप्पाचे आगमन खास करायचे असल्यास या सोप्प्या डिझाइन्स नक्की ट्राय करा.. (Ganesh Festival Rangoli)

गणपती विशेष सोप्पी व सुंदर रांगोळी:

फुलांच्या आरासात बसलेले गणपती बाप्पा

Ganeshotsav 2021 see here some beautiful best latest and trendy rangoli Designs based on ganesh rangoli theme
फुलांच्या आरासात बसलेले गणपती बाप्पा

फुलांच्या आरासात बसलेल्या गणपती बाप्पाची सुंदर रांगोळी तुम्ही काढून शकता. या सोप्प्या रांगोळीसाठी पहिला एक गोलाकार चक्रात फुला-पानांची वेल काढा. त्यानंतर मधोमध श्री गणेशांची डिझाईन काढा. यात रांगोळीत तुम्ही आवडीनुसार रंग भरु शकतात.

जास्वंदीच्या फुलात विराजमान बाप्पा

Ganeshotsav 2021 see here some beautiful best latest and trendy rangoli Designs based on ganesh rangoli theme
जास्वंदीच्या फुलात विराजमान बाप्पा

गणपतीच्या पूजेच्या साहित्यात जास्वंदीच्य़ा फुलाला अधिक महत्त्व आहे. कारण गणपतीला जास्वंदीचे फूल अधिक आवडते. याच फुलाचा समावेश रांगोळीत करुन आपण गणरायाचे सहज चित्र रेखाटू शकता.

- Advertisement -

गणपती बाप्पाच्या पावलांची रंगोळी

विविध रंगाचे गोल काढून त्यात तुम्ही आवडीचे रंग भरत गणपती बाप्पाची पावलं काढू शकता.

गणपती बाप्पाला जास्वंद प्रिय

Ganeshotsav 2021 see here some beautiful best latest and trendy rangoli Designs based on ganesh rangoli theme
गणपती बाप्पाला जास्वंद प्रिय

गणेशाला प्रिय असलेल्या जास्वंदीचं फुलांमध्ये विराजमान झालेल्या या बाप्पाभोवती विविध रंगांच्या फुलांची नक्षी रेखाटू शकतात. तसेच या रंगांमध्ये पांढरी रांगोळीही वापरलेली आहे.

- Advertisement -

गोलाकार नक्षीत बाप्पा स्थानापन्न

Ganeshotsav 2021 see here some beautiful best latest and trendy rangoli Designs based on ganesh rangoli theme
गोलाकार नक्षीत बाप्पा स्थानापन्न

रंगीबेरंगी फुलांच्या गोलाकार नक्षीत स्थानापन्न झालेला गणपती बाप्पाचे चित्र आपण काढू शकता. ही रांगोळी पणती लावून अधिकच सुशोभित करू शकता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -