घरदेश-विदेशearthquake uttarakhand : उत्तराखंडात ४.६ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप

earthquake uttarakhand : उत्तराखंडात ४.६ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप

Subscribe

उत्तराखंड आज सकाळी भूंकपाच्या धक्क्याने हादरले आहे. उत्तराखंडमधील जोशीमठ (Joshimath) पासून सुमारे ३१ किलोमीटर अंतरावर सकाळच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवू लागले. त्यामुळे नागरिकांमध्ये येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. भूकंपाचे झटके जाणवताच नागरिकांना घराबाहेर धाव घेत जीव वाचवण्यासाठी धडपड सुरु केली. मात्र या भूकंपादरम्यान कुठल्याही प्रकारचे नुकसानं झालं नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र भूकंपाची तीव्रता अधिक असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

- Advertisement -

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर इतकी होती. उत्तराखंडच्या जोशीमठपासून ३१ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पश्चिम दक्षिण पश्चिम (WSW) मध्ये आज पहाटे ५.५८ वाजता हा भूकंप झाला असल्याची माहिती आहे. उत्तराखंडच्या चमोली, पौडी, अल्मोडा इत्यादी जिल्ह्यात भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. तर आजूबाजूच्या राज्यालाही या भूकंपाचे हलके धक्के बसले असल्याची माहिती आहे. मात्र या भूंकपाच्या अचानक जाणवणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

यापूर्वी गुरुवारी हिमाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवू लागले बोते. या भूकंपाचे केंद्र चंबा जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली होती. जमिनीच्या आत पाच किलोमीटरवर हा भूकंप झाला होता ज्याची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती.

- Advertisement -

यापूर्वी ऑगस्टमध्ये उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये ३.८ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. तर २४ जुलै रोजी उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता .४ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. उत्तरकाशी आधी२८ जून रोजी उत्तराखंडच्या आणखी एका पर्वतीय जिल्हा पिथौरागढमध्ये ३.७ तीव्रतेचा भूकंप जाणवला. मग या भूकंपाचे केंद्रबिंदू पिथौरागढपासून ५५ किमी दूर आहे.

भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, यावर्षी उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये भूस्खलनाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या, यामध्ये सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झाला. ऑगस्ट महिन्यात शिमलामध्येही भूस्खलनाच्या घटना घडल्या. पावसामुळे येथे भूस्खलन होते, पण यावेळी याची संख्या खूप जास्त आहे.


Ganeshostav 2021: आरक्षण असणाऱ्या प्रवाशांना तपासणीनंतरच स्थानकात प्रवेश – कोकण रेल्वे


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -