घरताज्या घडामोडीकोविशिल्ड प्रकरणी ब्रिटनचे नियम भेदभावपूर्ण- भारताने सुनावले

कोविशिल्ड प्रकरणी ब्रिटनचे नियम भेदभावपूर्ण- भारताने सुनावले

Subscribe

भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी भारताच्या कोवीशिल्डला मान्यता न देण्याचा ब्रिटनचा निर्णय हा भेदभावपूर्ण असल्याचे म्हटले आहे. तसेच चर्चेतून यातून मार्ग काढता येईल अन्यथा ब्रिटनला योग्य उत्तर दिले जाईल असा इशाराही श्रृंगला यांनी दिला आहे.

भारतात दिल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीला ब्रिटनने मान्यता न देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भारत सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनचा निर्णय हा भारतीयांवर अन्याय करणारा असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

नेमके काय आहे प्रकरण

ब्रिटनने कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना नॉट व्हॅक्सिनेटेड ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतातून नोकरी, शिक्षण, किंवा व्यवसायासाठी ब्रिटनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांना कोव्हीशिल्डच्या दोन लसी घेऊनही ब्रिटनमध्ये क्वारनटाईन व्हावे लागणार आहे. दरम्यान, याबाबत ब्रिटनने भारत सरकारमध्ये चर्चा सुरू असून लवकरच त्यातून मार्ग काढण्याचे आश्वासन ब्रिटनने दिले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -