घरताज्या घडामोडीcruise drug bust : शाहरूख खानच्या ड्रायव्हरला NCB चा समन्स, चौकशीला हजर

cruise drug bust : शाहरूख खानच्या ड्रायव्हरला NCB चा समन्स, चौकशीला हजर

Subscribe

आर्यन खान कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असतानाच शाहरूख खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आणखी एक दणका दिला आहे. शाहरूख खानच्या ड्रायव्हरला NCB ने समन्स पाठवला आहे. या समन्समुळे शाहरूख खानचा ड्रायव्हर सध्या एनसीबी कार्यालयात आला आहे. नवाब मलिक यांच्या आरोपांवर खुलासा करणारी एनसीबीची पत्रकार परिषद सुरू असतानाच शाहरूखचा ड्रायव्हर एनसीबी कार्यालयात पोहचल्याची माहिती आहे. (NCB summons shah rukh khan driver in cruise drug bust case )

शाहरूखच्या ड्रायव्हरसोबतच चित्रपट निर्माता इम्तियाज खत्री यालाही एनसीबीने ताब्यात घेतले होते. शुक्रवारी इम्पियाज खत्रीच्या कार्यालयावर तसेच घरावर एनसीबीने धाड टाकली होती. त्याचीही चौकशी या प्रकरणी सुरू आज सकाळपासूनच सुरू आहे.

- Advertisement -

एनसीबीने कोर्टात सादर केलेल्या पंचनाम्याच्या कागदपत्रांमुळे शाहरूख खानची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. या पंचनाम्यानुसार आर्यन खानने चरस घेतल्याचे चौकशीत कबुल केले आहे. त्याचा मित्र अरबाज मर्चंटसोबत कॉर्डेलिया क्रूझवर चरस घेतले असल्याचे आर्यनने कबुल केले आहे. त्यानंतरच आर्यनला अटक करण्यात आली होती. अरबाजच्या बुटात ड्रग्ज लपवण्यात आले होते. चौकशीदरम्यान एनसीबीने हे ड्रग्ज ताब्यात घेतले.

आर्यन खानला चौकशी दरम्यान ड्रग्ज कुठून आणि कसे घेतल्याचे विचारण्यात आले. त्यावेळी आर्यन खानने अरबाजकडून ड्रग्ज घेतल्याचे स्पष्ट केले. अरबाजने त्याच्या चौकशी दरम्यान चरस हे बुटाच्या झीप पॉकेटमध्ये लपविल्याची माहिती दिली होती. त्यानंतर एनसीबीच्या चौकशीत हे ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले. हे ड्रग्ज चाचणी दरम्यान चरस असल्याचे आढळले. त्यानंतर एनसीबीने दोघांनाही ताब्यात घेतले. सध्या आर्यनची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे.
आर्यनच्या जामीन अर्जावर आता सोमवारी फैसला होणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Aryan drug case:आर्यनच्या अटकेचा शाहरुखला फटका, byju’sने बंद केल्या सगळ्या जाहिराती


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -