घरदेश-विदेशLive Update: राज्यात आज दिवसभरात २,२९४ नवे कोरोनाबाधित आढळले, तर २८ जणांचा...

Live Update: राज्यात आज दिवसभरात २,२९४ नवे कोरोनाबाधित आढळले, तर २८ जणांचा मृत्यू झाला

Subscribe

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २ हजार २९४ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २८ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. तसेच १ हजार ८२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाख ७७ हजार ८७२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३९ हजार ५४२ जणांचा मृत्यू झाला असून ६४ लाख १ हजार २८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्र ३३ हजार ४४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


मुंबईत गेल्या २४ तासांत ४५३ नवे कोरोनाबाधित आढळले असून ६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेत ४५७ जण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ४७ हजार ७५८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार १५८ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख २४ हजार ६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ५ हजार २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

तळजाई टेकडी विरोधात राज ठाकरे २४ ऑक्टोबरला पुण्यात आंदोलन करणार- वसंत मोरे


केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उद्याचा बंद, उद्याच्या महाराष्ट्र बंदला जनता पाठींबा देईल – नवाब मलिक

- Advertisement -

खानला वाचवण्यासाठी नवाब मलिक यांचा खटाटोप का? हिंदू असल्याने सुशांतसिंह राजपूतला व्यसनाधिन ठरवण्यात आलं का? नितेश राणेंचा सवावल


पुण्यात पेट्रोलचे दर १०९ रुपयांवर


लखीमपूर खेरी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. आशिष मिश्रा याची एसआयटीच्या पथकाकडून सुमारे १२ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना सहकार्य केले नाही, तसेच अनेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली नाहीत असे अटकेनंतर पोलिसांनी सांगितले आहे. या हिंसाचारप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेला आशिष शनिवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकासमोर हजर झाला होता. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील नऊ अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी पथकाने त्याची चौकशी केली.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -