घरताज्या घडामोडीAryan Khan ड्रग्ज केसमुळे समीर वानखेडे दबावात? पत्नीने केला खुलासा

Aryan Khan ड्रग्ज केसमुळे समीर वानखेडे दबावात? पत्नीने केला खुलासा

Subscribe

मुंबई पोलिसांची त्यांच्यावर नजर असल्याचा आरोप त्यांनी केला होता

एनसीबीने शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर एनसीबीचे मुंबई झोनल ऑफिसर समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आर्यन खानसह ८ लोकांना अटक करण्यात आली असून आज या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यात सगळ्यात एनसीबी ऑफिसर समीर वानखेडे यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे. मुंबई पोलिसांची त्यांच्यावर नजर असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याचप्रमाणे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीवर अनेक आरोप देखील केले गेले आहेत. या सगळ्यात समीर वानखेडे यांच्यावर दबाव असल्याचे म्हटले जात आहे. मात्र त्यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने खुलासा केला आहे.

ई टाईम्सशी बोलताना क्रांतीने सांगितले की, ‘दबावाला हँडल करणे समीर यांच्यासाठी खूप सोपे आहे ते काम ते खूप व्यवस्थितरित्या हाताळतात. ते आमच्या ऐतिहासिक लीडर्ससोबत कनेक्ट आहेत. जगभरातील अनेक लीडर्स विषयी ते सतत वाचत असतात. लोक समीर यांना सिंघम म्हणून ओळखतात मात्र खऱ्या आयुष्यात समीर यांचे वडिल रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत. समीर यांना कोणताही समस्या आली आणि त्यावर निर्णय घेऊ शकत नसतील तर ते त्यांच्या वडिलांशी जाऊन चर्चा करुन योग्य सल्ला घेतात.’

- Advertisement -

याआधी देखील क्रांतीने समीर यांच्या विषयी अनेक खुलासे केले होते. समीर हे आपल्या कामाशी प्रामाणिक असून त्यांनी कामासाठी आपले वयक्तिक आयुष्य पणाला लावले असल्याचे क्रांतीने म्हटले होते. तसेच मला त्यांचा आणि त्यांच्या कामाचा अभिमान असून मी नेहमी त्यांच्या कामाचा आदर करते असे देखील क्रांतीने सांगितले होते.

आज आर्यन खान प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे.  ८ ऑक्टोबरला जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज म्हणजेच १३ ऑक्टोबर ही पुढील सुनावणीची तारिख देण्यात आली होती. त्यामुळे आजचा दिवस आर्यन खानसाठी महत्त्वाचा असून त्याच्या सुटकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Aryan Khan : आर्यनची अटक निव्वळ राजकारण, शाहरुखचा होतोय ‘तमाशा’, जाहिरात दिग्दर्शकाचा संताप

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -