घरमहाराष्ट्रनाशिक नाट्य परिषदेचे रंगकर्मी पुरस्कार जाहीर

 नाट्य परिषदेचे रंगकर्मी पुरस्कार जाहीर

Subscribe

दीपक करंजीकर, विद्या करंजीकर, दत्ता पाटील यांचा होणार सन्मान

नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेतर्फे दिले जाणारे यंदाचे रंगकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या पुरस्कारांमध्ये अभिनयासाठी दिला जाणारा दत्ता भट स्मृती पुरस्कार दीपक करंजीकर, शांता जोग स्मृती पुरस्कार विद्या करंजीकर यांना, लेखनासाठीचा नेताजी तथा दादा भोईर पुरस्कार दत्ता पाटील, तर दिग्दर्शनासाठीचा प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार प्रदीप पाटील यांना जाहीर झालाय.

साहित्य संमेलनानंतर हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रा. रवींद्र कदम, सुनील ढगे, ईश्वर जगताप, विजय शिंगणे, राजेश भुसारे, राजेश जाधव, रवींद्र ढवळे यांच्या निवड समितीने पुरस्कारार्थींची निश्चिती केली. दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. यावेळी खजिनदार ईश्वर जगताप, राजेश भुसारे, विजय शिंगणे, राजेश जाधव, उमेश गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान, शुक्रवारी (दि. ५) रंगभूमी दिनानिमित कालिदास कलामंदिर येथे पदाधिकार्‍यांच्या हस्ते नटराजपूजन होईल. यावेळी नाट्य परिषदेतर्फे नांदी सादर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हे आहेत पुरस्कारांचे मानकरी

  • दत्ता भट पुरस्कार (अभिनय- पुरुष) – दीपक करंजीकर
  • शांता जोग स्मृती पुरस्कार (अभिनय-स्त्री)- विद्या करंजीकर
  • प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार (दिग्दर्शन)- प्रदीप पाटील
  • नेताजी तथा दादा भोईर पुरस्कार (लेखन)- दत्ता पाटील
  • पुरोहित स्मृती पुरस्कार (बालरंगभूमी)- सुरेश गायधनी
  • जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार (सांस्कृतिक पत्रकारिता) – धनंजय वाखारे
  • गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार (प्रकाशयोजना) – विनोद राठोड
  • रामदास बरकले स्मृती पुरस्कार (लोककलावंत) – जितेंद्र देवरे
  • शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार (शाहीर पुरस्कार) – राजेंद्र जव्हेरी
  • विजय तिडके स्मृती पुरस्कार (रंगकर्मी कार्यकर्ता) – राजेंद्र तिडके
  • शंकरराव बर्वे स्मृती विशेष योगदान पुरस्कार :
    (चित्रकार व रांगोळी) नारायण चुंबळे
    (सामाजिक कार्य) निवृत्ती चाफळकर
    संगीत कारकीर्द – संजय गिते
    तबला साथसंगत- नितीन वारे
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -