घरक्रीडाविंडीजचे प्रशिक्षक लॉ यांच्यावर दोन वनडे सामन्यांची बंदी

विंडीजचे प्रशिक्षक लॉ यांच्यावर दोन वनडे सामन्यांची बंदी

Subscribe

वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्यामुळे दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्यामुळे दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना भारताविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांना मुकावे लागणार आहे.

का घातली बंदी 

विंडीज आणि भारताच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात अश्विनच्या गोलंदाजीवर विंडीजचा सलामीवीर किरन पॉवेल अजिंक्य रहाणे करवी झेलबाद झाला होता. रहाणेने पकडलेला झेल मैदानाच्या अगदी जवळ होता. त्यामुळे मैदानात असलेल्या पंचांनी तिसऱ्या पंचाला निर्णय विचारला. तिसऱ्या पंचाने पॉवेलला बाद करार केले. पंचांच्या या निर्णयामुळे लॉ यांना आपला राग अनावर झाला. त्यांनी तिसरे पंच आणि सामनाधिकारी यांना खडे बोल सुनावले. त्यामुळे त्यांना ३ डिमेरीट पॉईंट देण्यात आले आहेत. तसेच सामन्याच्या मानधनाच्या १०० टक्के दंडही ठोठवण्यात आला आहे.


वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेला २१ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना गुवाहाटी तर दुसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -