घरमनोरंजनDiwali २०२१:हृतिक रोशनच्या घरी दिवाळीची धामधूम

Diwali २०२१:हृतिक रोशनच्या घरी दिवाळीची धामधूम

Subscribe

दिवाळी हा सण प्रत्येकासाठी खास असतो. बॉलिवूडमध्येही अनेक दिग्गज कलाकारांच्या घरी दिवाळीनिमित्त अनेक बड्या पार्टींचे आयोजन केले जाते. दरम्यान,बॉलिवूडचा सूपरस्टार हृतिक रोशनने देखील आपल्या कुटुबियांसोबत दिवाळी आनंदाने साजरी केली आहे. त्याने आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत काही खास क्षण सोशल मीडिया अकांऊटवर पोस्ट केले आहेत.
हृतिकने वडील राकेश रोशन, पिंकी रोशन, सुनैना रोशन, भाची सुरनिका रोशन आणि काका आणि आजीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. आनंदी कुटुंबाचा फोटो शेअर करण्यासोबतच हृतिक रोशनने एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे. हृतिकने कॅप्शन लिहिले- प्रेमाने भरलेलं हृदय. आशेने भरलेले डोळे… दिवाळीच्या शुभेच्छा. यासोबत हृतिक रोशनने हार्ट इमोजी  दिला आहे.दिवाळीला हृतिक रोशन कुटुंबासोबत खूप धमाल करतो. हृतिकने सणासुदीचे आनंदाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचे संपूर्ण कुटुंब दिवाळीनिमित्त पारंपारिक कपडे परिधान करून सज्ज झाले. हृतिक रोशन आपल्या कुटुंबाशी किती संलग्न आहे, हे त्याने एका आनंदी कुटुंबाचा फोटो शेअर करून नेटकऱ्यांना दाखवून दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

- Advertisement -

हृतिक रोशन आणि सुजैन खान 2014 मध्ये वेगळे झाले होते पण ते आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन करत आहेत. सण-उत्सवांपासून अनेक प्रसंगी हृतिक, सुजैन खान आणि त्यांची दोन मुलं एकत्र दिसतात. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर हृतिक रोशन दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘विक्रम वेध’मध्ये सैफ अली खानसोबत हृतिक रोशन दिसणार आहे. फायटरमध्ये तो दीपिका पदुकोणसोबत अभिनय करताना दिसणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा –  अनिल कपूरच्या मुलाला फटाक्यांबाबत ट्विट करणे पडले महागात

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -