घरठाणेST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या बंदात कळवा कार्यशाळा कर्मचारीही सहभागी

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या बंदात कळवा कार्यशाळा कर्मचारीही सहभागी

Subscribe

बंदामुळे आठ डेपोत सर्व बसेस उभ्या, प्रवासाचे हाल

गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. सोमवारी त्या आंदोलनात आता कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी बंद पाळून सहभागी झाले आहेत. ठाण्यातील एकूण ३२०० कर्मचाऱ्यांपैकी २७०० कर्मचारी बंदात सहभागी झाल्याने ठाणे जिल्ह्यातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील आठ ही डेपोत एसटी बसेस उभ्या असल्याने प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले आहेत. एसटीच्या कामगारांनी पुकारलेल्या या बंदमुळे एसटीचे दिड दिवसात १ कोटी १० लाखांचे नुकसान झाले आहे. तर या संपाला ठाण्यात भारतीय जनता पार्टीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही पाठिंबा दर्शवला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला अद्यापही राज्य शासनाकडून सकारात्मक चर्चा झालेली नाही. त्यामुळे आता हळूहळू एसटी कर्मचारी १०० टक्के काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. ठाण्यातील डेपो १ आणि डेपो दोन मध्ये रविवार पासून एकही बस बाहेर पडलेली नाही. तर रविवारी दुपारपासून विठ्ठलवाडी डेपोतून कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केले. त्यानंतर रविवारी मध्यरात्री पासूनच जिल्ह्यातील आठही डेपोतून कामगारांनी १०० टक्के बंद पुकारला. या बंदामुळे जिल्ह्यातील आठ डेपोतून ४९० पैकी एकही बस रस्त्यावर उतरली नाही. या बंदमध्ये एसटीच्या ३२०० पैकी २७०० कामगार सहभागी झाले असून उर्वरीत १० टक्के स्टाफ हा कार्यालयात असल्याने ते या बंदमध्ये सहभागी झाले नसल्याचे दिसून आले.

- Advertisement -

ताटकळलेल्या प्रवासी खासगी बसच्या वाटेला

दिवाळीची सुट्टी असल्याने अनेक प्रवासी आपल्या गावाला निघाले होते. परंतु सोमवारी या प्रवाशांची घोर निराशा झाली. आता बस येईल थोडय़ा वेळाने बस येईल असे प्रवाशांना वाटत होते. त्यामुळे खोपट आणि वंदना डेपोत अनेक प्रवासी बसची वाट पाहत असल्याचे दिसून आले. परंतु बस न आल्याने काहींनी परतीचा मार्ग स्विकारला तर काहींनी खाजगी बसने आपले गाव गाठण्याचा प्रयत्न केला.

कळवा कार्यशाळेच्या गेटवर आंदोलन

एसटीच्या कळवा येथे या कार्यशाळेत १६५ कामगार कामावर असतात. परंतु कर्मचाऱ्यांनी सोमवारी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होण्याची निर्णय घेतला. त्यामध्ये १५९ कामगारांनी सहभागी होत कार्यशाळेच्या गेटवर काम बंद आंदोलन करीत घोषणा बाजी केली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -