घरताज्या घडामोडीFood Hike: इंधन दरवाढ, महागाईचा परिणाम! हॉटेल - रेस्टॉरंटचा मेन्यू ३० टक्क्यांनी...

Food Hike: इंधन दरवाढ, महागाईचा परिणाम! हॉटेल – रेस्टॉरंटचा मेन्यू ३० टक्क्यांनी वाढणार- आहार

Subscribe

वाढती इंधनदरवाढ आणि महागाईमुळे दैनंदिन खर्च भरुन काढण्यासाठी हॉटेल रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही

देशात इंधनदरवाढीबरोबरच व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही मोठी वाढ करण्यात आली. याचा फटका केवळ हॉटेल किंवा रेस्टॉरंट व्यायसायिकांना नाहीच तर सर्वसामान्यांना देखील बसणार आहे कारण आत हॉटेल, रेस्टॉरंटमधील जेवण आणखी महागण होणार आहे. हॉटेल रेस्टॉरंटमधील सर्व खाद्यपदार्थांचे दर ३० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्रातील रेस्टॉरंट मालक संघटनेने घेतला आहे. वाढती इंधनदरवाढ आणि महागाईमुळे दैनंदिन खर्च भरुन काढण्यासाठी हॉटेल रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही असे हॉटेल चालकांच्या आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी म्हटले आहे. कोरोना काळातही हॉटेल व्यावसायावर मोठा परिणाम झाला. व्यवसाय बंद असल्याचे आमच्या खर्चात वाढ झाली तर उत्पन्नात घट झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता त्याची नुकसान भरपाई भरुन काढण्यासाठी आणि हॉटेल व्यावसायात तग धरुन ठेवण्यासाठी आम्हाला खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवण्यापलिकडे काहीच नाही असे त्यांनी म्हटले आहे.

एका लहान हॉटेलमध्ये दिवसाला व्यावसायिक सिलेंडरमधील सरासरी २ सिलेंडर वापरले जातात. तर मोठ्या हॉटेल्समध्ये एका दिवसाला व्यावसायिक वापरातील ५ सिलेंडर वापरले जातात. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एलपीजी व्यावसायिक सिलेंडर १ हजार ८९ रुपयांना मिळत होता तोच सिलेंडर आता १ हजार ६८३ रुपयांना मिळतो आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीमुळे एका सिलेंडरमागे तब्बल ६०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांचा दिवसाचा खर्च हा १२०० ते ३ हजारांवर गेला आहे. महिन्याअखेरीज हॉटेल व्यावसायिकांचा खर्च हा एक लाखांच्या घरात जात आहे. महिन्याच्या शेवटी हॉटेल व्यावसायिकांच्या खर्चात ३५ हजार ते १ लाख रुपयांची वाढ होत आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचा खर्च आता दुप्पट झाला आहे जो त्यांना न परवडणारा असल्याने हॉटेल रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या किंमती ३० टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहेत.

- Advertisement -

देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतींचा भडका उडालेला असतानाच ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर व्यावसायायिक सिलेंडरच्या किंमतीत २६६ रुपयांनी वाढ करण्यात आली. ज्याचा मोठा फटका हा हॉटेल व्यावसायिकांना बसला. ऑक्टोबर महिन्यातही व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती.


हेही वाचा – LPG Price Hike: दिवाळीच्या मुहूर्तावर कमर्शिअल सिलेंडरच्या किंमती २६६ रुपयांनी वाढल्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -