घरताज्या घडामोडीसावधान…! वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना न्यूमोनियाचा संसर्ग, N-95 मास्क लावण्याचा डॉक्टरांचा सल्ला

सावधान…! वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना न्यूमोनियाचा संसर्ग, N-95 मास्क लावण्याचा डॉक्टरांचा सल्ला

Subscribe

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या सावटामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्यातच वाढते प्रदूषणही नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असून,श्वसनाचे आजार बळावत चालले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयांमध्ये श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तपासणीत अनेक रुग्णांमध्ये न्यूमोनिया आढळून येत आहे. फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. हल्ली या फुफ्फुसाच्या समस्या वारंवार वाढत चालल्या आहेत.दिल्ली एनसीआरसह जवळपासच्या अनेक राज्यांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. प्रदूषित हवेत श्वास घेण्याच्या अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. नागरिक सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास तसेच न्यूमोनियाच्या तक्रारी करत आहेत.

वायूप्रदूषणामुळे फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे ही आजाराची समस्या वाढली आहे. श्वासोच्छवासासह खोकला हे त्याचे प्रारंभिक लक्षण आहे. खोकला दिवसेंदिवस वाढत असेल आणि त्यासोबत कफही येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण न्युमोनियाचे लक्षण लवकर समजले नाहीतर रुग्णांसाठी तो जीवघेणा ठरू शकतो.

- Advertisement -

दरवर्षी थंडीच्या मोसमास श्वसनाच्या आजाराचे रुग्ण वाढत असतात. यावर्षीदेखील न्यूमोनिया या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.सीओपीडी आणि ब्राँकायटिसची समस्या लोकांमध्ये दिसून येत आहे. वाढत्या प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी लोकांनी N-95 मास्क घालणे आणि सकाळी आणि संध्याकाळी फिरायला न जाणे आवश्यक आहे.ज्या रुग्णांना दम्याचा त्रास आहे, अश्या रूग्णांना नेहमी सोबत इनहेलर ठेवण्याचा आणि अनावश्यकपणे घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अवी कुमार यांनी दिला आहे.

लस घेणे आवश्यक

जर न्यूमोनिया झाला असेल किंवा फुफ्फुसांशी संबंधित संसर्ग असेल तर ही आजाराची समस्या टाळण्यासाठी फ्लूची लस घेणे आवश्यक आहे. ही लस घेतल्यामुळे श्वसनाच्या समस्या कमी होतात. ही लस सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता,असे डॉक्टर आशुतोष यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तपासणीत आलेल्या बहुतेक  रुग्णांमध्ये न्यूमोनिया आढळून येत आहे,असे गुरुग्रामच्या मॅक्स हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाचे वरिष्ठ संचालक डॉ. आशुतोष शुक्ला यांनी सांगितले आहे.

रुग्णालयातील सुमारे २० टक्के रुग्णांना न्यूमोनियाची लक्षणे दिसत आहेत. या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असून त्यांना सतत खोकला येत आहे. दम्याच्या रुग्णांना न्यूमोनियाचा सर्वाधिक त्रास होत आहे, असे दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अजय कुमार यांनी सांगितले आहे.


हे ही वाचा – Heart Attack: मध्यरात्रीपर्यंत जागणाऱ्यांना ह्रदयरोगाचा धोका सर्वाधिक, ‘ही’ आहे झोपण्याची योग्य वेळ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -