घरट्रेंडिंगHeart Attack: मध्यरात्रीपर्यंत जागणाऱ्यांना ह्रदयरोगाचा धोका सर्वाधिक, 'ही' आहे झोपण्याची योग्य...

Heart Attack: मध्यरात्रीपर्यंत जागणाऱ्यांना ह्रदयरोगाचा धोका सर्वाधिक, ‘ही’ आहे झोपण्याची योग्य वेळ

Subscribe

देशात सध्या ह्रदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण मंडळी ह्रदयरोगाला बळी पडत आहेत. नुकताच अभिनेता पुनीत राजकुमार आणि सिद्धार्थ शुल्का सारख्या बॉलिवूड कलाकारांचा ह्रदयरोगामुळे मृत्यू झाला. चुकीच्या जिवनशैलीमुळे ह्रदयरोगाचा धोका वाढत असल्याचे अनेकांनी सांगितले आहे मात्र नुकत्याच होती आलेल्या एका अध्ययनातून मध्यरात्रीपर्यंत जागणाऱ्या लोकांना ह्रदयरोगाचा सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे. ब्रिटेनच्या यूनिवर्सिटी ऑफ एक्सटरच्या वैज्ञानिकांनी हा रिसर्च केला आहे. प्रो. डेव्हिड प्लान्स यांनी म्हटले आहे की, आपले शरीर हे २४ तास चालणाऱ्या घडळ्याप्रमाणे असून याला सर्केडियन रिदम असे म्हणतात. सर्केडियन रिदम मुळे आपली मानसिक आणि शारिरीक क्रिया संतुलित राखण्यास मदत करते.


वैज्ञानिकांच्या रिसर्चसाठी ८८ हजार लोकांच्या हातावर एक डिव्हाइज बांधले. ज्यात लोक आठवड्याचे सात दिवस किती वाजता झोपतात याचा त्यांनी अभ्यास केला. पहिल्यांदा त्यांना ३१७२ लोकांमध्ये ह्रदयासंबंधी समस्या असल्याचे समोर आले. ज्यात हार्ट अटॅक, स्ट्रोक, हॉर्ट फेल सारख्या समस्यांनी लोक ग्रस्र होते.

- Advertisement -


वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, वेळेवर झोपणे आरोग्यासाठी उत्तम आहे. वेळेवर झोपल्याने व्यक्ती सकाळच्या सूर्यप्रकाशात येतात. सकाळचा सूर्यप्रकाश माणसांच्या शरिरासाठी फार उपयोगी असतो. यामुळे आपले शरीर स्वत:ला स्वत:हून रिसेट करण्यास मदत करते. वयस्कर व्यक्तींनी रात्री ७ ते ९ तास शांत झोप घेणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे रात्री झोप घेण्याची योग्य वेळ ही रात्री १० ते ११ वाजताच्या दरम्यानची असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Fashion Tips: लग्नसोहळा असो किंवा पार्टी ‘या’ चार साड्यांनी तयार करा तुमचा क्लासी लुक

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -