घरताज्या घडामोडीAmjad Khan B'day Special : शोलेत गब्बरच्या रोलसाठी अमजद खान नव्हता फर्स्ट...

Amjad Khan B’day Special : शोलेत गब्बरच्या रोलसाठी अमजद खान नव्हता फर्स्ट चॉईस

Subscribe

गब्बरच्या रोलसाठी घाबरले होते अमझद खान

आज हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार हयात नसले तरी, त्यांच्या भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. याशिवाय त्यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवास आणि रंजक किस्स्यांमुळे नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असतात. शोले चित्रपटामध्ये ‘गब्बर’ साकरणारे दिवंगत अभिनेते अमजद खान यांचा आज १२ नोव्हेंबरला वाढदिवस असतो. १२ नोव्हेंबर १९४० मध्ये अमजद खान यांचा जन्म झाला.अभिनेते अमजद खान यांनी सुमारे २० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत १३२ हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अमझद खान यांनी आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत केवळ खलनायकच नव्हे तर विनोदी कलाकार म्हणूनही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

“यहाँ से पचास-पचास कोस दूर जब बच्चा रात को रोता है तो माँ कहती है सो जा बेटे नहीं तो गब्बर आ जाएगा” हा शोले चित्रपटातील खलनायक गब्बरचा डायलॉग आजही अजरामर आहे.​​’शोले’ चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर अमझद  खान यांना मागे वळून पाहावे लागले नाही. अमजदने ‘चरस’, ‘परवरिश’, ‘अपना खून’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘सुहाग’, ‘कुर्बानी’, ‘याराना’ अशा अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि त्या गाजल्यादेखील.

- Advertisement -

गब्बरच्या रोलसाठी घाबरले होते अमझद खान

अमझद खान यांनी शोले चित्रपटात गब्बर या खलनायकाची भूमिका पार केली.मात्र खऱ्या आयुष्यात मात्र अमझद खान हे शांत आणि मिश्किल स्वभावाचे होते मात्र त्यांना जेव्हा गब्बरची भूमिका साकारायला सांगितली तेव्हा ते घाबरले. त्याकाळी हिंदी सिनेसृष्टीत खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले डॅनी डेंझोप्पा, यांना सर्वप्रथम गब्बरचा रोल ऑफर करण्यात आला होता. इतकंच नाही तर त्यावेळी ‘स्क्रीन’ मासिकाच्या कव्हर पेजवर शोलेच्या संपूर्ण टीमसोबत डॅनी यांचा फोटोही छापून आला होता. त्यामुळे शोले चित्रपटात डॅनीच गब्बर साकारणार हे जवळपास नक्कीच झाले होते. मात्र, डॅनी यांना त्याचदरम्यान फिरोज खानच्या ‘धर्मात्मा’ चित्रपटाचे शूटिंग करायचे होते. हे शूटिंग अफगाणिस्तानमध्ये असल्यामुळे डॅनी यांना शोले चित्रपट सोडावा लागला.

- Advertisement -

त्याचवेळी सलीम खान यांनी जावेद अख्तर यांना अमजद खान यांचे नाव सुचवले. जावेद अख्तर यांनीही दिल्लीत असताना, एका नाटकामध्ये अमजद यांचा अभिनय पाहिला होता. अशातच सलीम खानने नाव त्याचं नाव सुचवल्यामुळे, अमजद यांना रितसर ऑडिशनसाठी बोलावण्यात आले. ऑडिशन आणि स्क्रिन टेस्ट पास केल्यानंतरच अमजद यांच्या वाट्याला गब्बरचा रोल आला. रमेश सिप्पीने जेव्हा ऑफर दिली आणि गब्बरची भूमिका नाकारली तेव्हा अमजद घाबरला होता, पण सिप्पी साहेबांना पहिल्याच भेटीत वाटले होते की जर अमजद गब्बरची भूमिका साकारेल तर इतिहास रचला जाईल. मात्र, नंतर अमजद खान यांनी ही भूमिका आव्हान म्हणून स्वीकारली आणि ‘गब्बर सिंग’ची भूमिका हिंदी चित्रपटांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली.

‘लावारीस’ या सुपरहिट चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका साकारली आणि ‘याराना’मध्ये अमिताभच्या मित्राच्या भूमिकेत दिसणे हा त्यांच्या अष्टपैलू अभिनयाचाच चमत्कार होता.सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि संजीव कुमार यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये अमजद या चित्रपटात एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी ठरला.


हे ही वाचा – लग्नानंतर Vicky Kaushal आणि Katrina Kaifचा हनीमूनचा प्लॅन ऐकून व्हाल थक्क


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -