घरताज्या घडामोडीलग्नानंतर Vicky Kaushal आणि Katrina Kaifचा हनीमूनचा प्लॅन ऐकून व्हाल थक्क

लग्नानंतर Vicky Kaushal आणि Katrina Kaifचा हनीमूनचा प्लॅन ऐकून व्हाल थक्क

Subscribe

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कॅफच्या (Katrina Kaif) लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जरी अजूनपर्यंत दोघं याबाबत स्वतःहून काही बोलले नसले तरी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोघे लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. राजस्थानच्या सवाई माधोपरच्या सिक्स सेंस फोर्टवर विक्की आणि कतरिना लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. लवकरच याबाबत दोघे अधिकृत घोषणा करू शकतात. यादरम्यान विक्की आणि कतरिनाच्या हनिमून प्लॅनचा खुलासा झाला आहे.

विक्का आणि कतरिनाचा हनिमून प्लॅन?

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, लवकरच विक्की आणि कतरिना आपल्या लग्नाबाबत घोषणा करणार आहेत. त्या दोघांची गुपचूप पद्धतीने काहीसुद्धा करण्याची इच्छा नाही. तसेच विक्की आणि कतरिना आपल्या कामातून कोणताही मोठा ब्रेक घेऊ इच्छित नाहीत. लग्नानंतर दोघेही कामासंदर्भात केलेल्या कमिटमेंट पूर्ण करतील. यामुळे दोघेसुद्धा हनीमून करणार नाहीत. लग्नानंतर कतरिना लगेचच कामावर परतणार आहे. तिला सलमानसोबतच्या ‘टायगर ३’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण करायची आहे. तर दुसऱ्या बाजूला विक्की स्वतःच्या कामाला सुरुवात करेल.

- Advertisement -

दरम्यान माध्यमाच्या काही वृत्तानुसार दिवाळीमध्ये विक्की आणि कतरिनाची रोका सेरेमनी पार पडली. विक्की आणि कतरिनाचे लग्न बॉलिवूडमधील हेवी बजेटवाले असणार आहे. ज्यामध्ये राजस्थानची रॉयल्टी पाहायला मिळेल.


हेही वाचा – रोहित शेट्टी आणि अजय देवगणचा Singham 3 चित्रपट Article 370वर आधारित; कॉन्सेप्टचा झाला खुलासा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -