घरमनोरंजननोरा फतेही साकारणार सुश्मिता सेनचे 'दिलबर'

नोरा फतेही साकारणार सुश्मिता सेनचे ‘दिलबर’

Subscribe

संजय कपूर आणि प्रिया गिल यांचा नव्वदच्या दशकात आलेल्या ‘सिर्फ तुम’ या चित्रपटामध्ये बॉलीवूड दिवा सुश्मिता सेनवर चित्रित करण्यात आलेले ‘दिलबर’ हे गाणं आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. त्यावेळी चार्टबर्स्टर असणारे हे गाणं पुन्हा नव्यानं जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ चित्रपटात चित्रित करण्यात येणार आहे. आपल्या बेली डान्ससाठी प्रसिद्ध असणारी नोरा फतेहीवर हे गाणं चित्रित करण्यात येणार आहे.
याविषयी अभिनेत्री नोरा फतेहीने सांगितलं की, ‘कोणत्याही प्रसिद्ध गाण्याचं रिमेक करताना तुम्हाला नेहमी एक दडपण असतं. तुम्ही त्या गाण्याला योग्य न्याय देऊ शकाल की नाही ही सतत तुमच्या मनात भीती असते. या गाण्यातील सुश्मिताचा वावर अप्रतिम होता, तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण मी या गाण्याला न्याय देऊ शकेन अशी नक्कीच मला आशा आहे.’ नोराने पुढे असेही सांगितले की, ‘मला ही संधी दिल्याबद्दल भूषण कुमार आणि मिलाप झवेरीची मी आभारी आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय. हे गाणं वेगळ्या तऱ्हेने चित्रित करण्यात आले असून नक्कीच त्यातील माझा डान्स लोकांना आवडेल. प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे.’
चित्रपटाचा नायक जॉन अब्राहम यावेळी म्हणाला की, ‘सत्यमेव जयते हा एक अतिशय पॉवरफुल मसालेदार चित्रपट असून दिलबर हे ९० च्या दशकातील खूपच प्रसिद्ध गाणं होतं आणि आमच्यावर या गाण्याच्या रिमेकचं चित्रिकरण नक्कीच प्रेक्षकांना आवडेल आणि त्यांचं मन आम्ही नक्कीच जिंकू.’
जॉन अब्राहम हा बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यामुळे आता दिलबर हे गाणं परत लोकांच्या मनावर राज्य करेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -