घरताज्या घडामोडीहरिण, काळविटांसाठी प्रसिद्ध ममदापूरला पर्यटकांसाठी आता राहण्याची सुविधा

हरिण, काळविटांसाठी प्रसिद्ध ममदापूरला पर्यटकांसाठी आता राहण्याची सुविधा

Subscribe

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते निवास व्यवस्थेचं उद्घाटन

हरिण आणि काळविटांसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला तालुक्यातल्या ममदापूर राखीव क्षेत्रात जाणार्‍या पर्यटकांसाठी आता राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध झालीय. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या पर्यटन निवास व्यवस्थेचं उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झालं.

वन्यजीवांच्या संवर्धनासह वनपर्यटनातनं या क्षेत्राचा विकास साधणार असल्याची ग्वाही यावेळी भुजबळांनी दिली. जगभरात पक्षी, प्राणी आणि वन्यजीवांना वाचवण्यासह वनपर्यटनासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता आपल्यालाही त्या दिशेनं जावं लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. लवकरच उर्वरित प्रकल्पांनाही सुरुवात होणार असल्यानं पर्यटकांसाठी ही बाब महत्त्वाची ठरणार आहे. आजवर मुक्कामासाठी व्यवस्था नसल्यानं वन्यजीव पाहण्यासाठी पर्यटकांना मध्यरात्रीच निघावं लागत होतं. मात्र, आता राहण्याची सुविधा झाल्यानं वन्यजीवांच्या मुक्तसंचाराचा आनंद घेणं सहज शक्य होणार आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -