घरदेश-विदेशLPG Subsidy : गॅस सिलेंडरवर subsidy चेक करण्याच्या सोप्या स्टेप्स

LPG Subsidy : गॅस सिलेंडरवर subsidy चेक करण्याच्या सोप्या स्टेप्स

Subscribe

एलपीजी अर्थात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात दिवसेंदिवस वाढ होतेय. वर्षभरात हा दर १००० रुपयांवर पोहचला. अशातच ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण ग्राहकांना एलपीजी गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिटी पुन्हा एकदा दिली जाणार असल्याचे म्हटले जातेय. या गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडीची रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, एलपीजी गॅस ग्राहकांना ७९.२६ रुपये प्रति सिलेंडरमागे सबसिडी म्हणून दिले जाणार आहेत.

दरम्यान काही ग्राहकांना १५८.५२ रुपये तर काहींना २३७.७८ रुपये सबसिडी मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या सबसिडीवरून सध्या संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्राहक सबसिडीची रक्कम खात्यात जमा होत नसल्याची तक्रार करत होते. मात्र या तक्रारी आता बंद झाल्या आहेत. मात्र तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये सबसिडीची रक्कम येतेय की नाही हे पाहायचे असल्यास खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

- Advertisement -

गॅस सिलेंडरवरील subsidy चेक करण्याच्या सोप्या स्टेप्स

गॅस सबसिडीची रक्कम पाहण्याची दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे नोंदणीकृत मोबाईल नंबरद्वारे आणि दुसरा म्हणजे एलपीजी आयडीद्वारे. (गॅस पासबुकवरील नंबर)

१) सर्वप्रथम http://mylpg.in/ वर जा. यानंतर LPG Subsidy Online वर क्लिक करा.

- Advertisement -

२) आत्ता तीन एलपीजी सिलेंडर कंपन्यांचे टॅब ओपन होतील. यात तुमच्या सिलेंडर ज्या कंपनीचा आहे त्यावर क्लिक करा.

३)आत्ता Complaint ऑप्शन निवडून Next या बटणावर क्लिक करा.

४) यानंतर एक नवीन इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये तुमचे Bank डिटेल्स दिसेल.

४) या डिटेल्सवरून तुम्हाला समजेल की, सबसिडीचे पैसे तुमच्या खात्यात येत आहेत की नाही.


 

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -