घरक्रीडाR Ashwin : अश्विनने एका दशकात जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉडसारख्या दिग्गज खेळाडूंना...

R Ashwin : अश्विनने एका दशकात जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉडसारख्या दिग्गज खेळाडूंना टाकले मागे

Subscribe

अश्विनने मागील १० वर्षात आपल्या घरच्या मैदानावर खेळताना ४४ कसोटी सामन्यांत एकूण २६४ बळी पटकावले आहेत

रवीचंद्रन अश्विनला कसोटी क्रिकेटमध्ये १० वर्षं पूर्ण झाली आहेत. अश्विनने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत एकूण ७९ कसोटी सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने एकूण ४१३ बळी पटकावले आहेत. दरम्यान भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या सुरू असलेल्या कानपूरच्या सामन्यात अश्विनने ९ बळी घेतले तर तो आणखी ३ दिगग्ज खेळाडूंना मागे टाकू शकतो. टी-२० मालिकेवर कब्जा मिळवल्यानंतर आता भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनकडे असणार आहे. मागील १० वर्षात आपल्या घरच्या मैदानावर खेळताना अश्विन सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे. मागील १० वर्षात कसोटी सामन्यांत सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून अश्विनचा समावेश क्रमवारीत उच्च स्थानी असल्याचे पहायला मिळते.

अश्विनने मागील १० वर्षात आपल्या घरच्या मैदानावर खेळताना ४४ कसोटी सामन्यांत एकूण २६४ बळी पटकावले आहेत. अश्विनचा हा विक्रम पाहता भारतीय संघासाठी सुखद बाब म्हणजे सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत साहजिकच संघाला फायदा मिळू शकतो.

- Advertisement -

दरम्यान अश्विनच्या नंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचे नाव आहे. त्याने या दशकात घरच्या मैदानावर सर्वाधिक ६१ कसोटी सामने खेळले आहेत ज्याच्यात त्याने २५३ बळी घेतले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंच्या जेम्स अँडरसनचे नाव आहे. त्याने ५६ कसोटी सामन्यांमध्ये २३८ बळी घेतले आहेत. चौथ्या क्रमांकावर २१० बळींसह श्रीलंकेचा रंगणा हेराथ तर ५ व्या क्रमांकावर २०० बळींसह ऑस्ट्रेलियाच्या नाथन लिओनची नोंद आहे. या दशकात आतापर्यंत याच ५ गोलंदाजांनी २०० हून अधिक बळी पटकावले आहेत.

जर घरच्या आणि बाहेरच्या मैदानावरील कसोटी सामन्यांची बाब लक्षात घेतली तर अश्विनचा जागतिक पातळीवर तिसरा क्रमांक लागतो. या १० वर्षात अश्विनने एकूण ७६ सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने ३९१ बळी घेतले आहेत. अश्विनपेक्षा वरच्या स्थानावर स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसनचा नंबर आहे. दोघांनीही अनुक्रमे 392 बळी पटकावले आहेत. अशातच अश्विनकडे दोन्ही टॉपच्या गोलंदाजांना मागे टाकून पुढे जाण्याची सुवर्णसंधी आहे.

- Advertisement -

दरम्यान अश्विनने कानपूरच्या पहिल्या कसोटी सामन्यात ९ बळी घेतले तर तो जवळच्या ३ दिग्गज गोलंदाजांना मागे टाकेल. यांमध्ये सर्वात आधी वसीम अकरम हे असतील, त्यांच्या नावावर एकूण ४१४ बळींची नोंद आहे. त्यांनतर हरभजन सिंग त्याने एकूण ४१७ बळी घेतले आहेत. या दोघांनाही अश्विन लवकरच मागे टाकू शकतो. कारण यांना मागे टाकण्यासाठी अश्विनला फक्त ५ बळी घेण्याची आवश्यकता आहे. तर यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेच्या हरफनमौला शॉन मौला यांची नोंद आहे. त्यांच्या नावावर एकूण ४२१ बळींची नोंद आहे.


हे ही वाचा: IND vs NZ Test series : कोच राहुल द्रविडच्या पुढाकाराने खंडित परंपरा सुरू; सुनिल गावस्करांच्या हस्ते अय्यरला कॅप


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -