घरक्रीडाOmicron Variant : झिम्बाब्वेमध्ये श्रीलंकेच्या ६ खेळाडूंना कोरोनाची लागण; ICC ने रद्द...

Omicron Variant : झिम्बाब्वेमध्ये श्रीलंकेच्या ६ खेळाडूंना कोरोनाची लागण; ICC ने रद्द केली होती विश्वचषकाची पात्रता फेरी

Subscribe

श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघातील ६ खेळांडूना कोरोनाची लागण झाली आहे

आयसीसीने शनिवारी झिम्बाब्वेतील हरारेमध्ये होणार असलेल्या महिला विश्वचषकातील २०२१ ची पात्रता फेरी रद्द केली होती. शनिवारीच श्रीलंकेच्या संघातील एक स्टाफ कोरोनाने संक्रमित असल्याचे उघड झाले होते. मात्र आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघातील ६ खेळांडूना कोरोनाची लागण झाली आहे. आशियाई क्रिकेट बोर्डाने रविवारी याबाबत माहिती दिली. शनिवारी आयसीसीने दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरियंट समोर आल्यानंतर खबरदारी म्हणून विश्वचषकाची पात्रता फेरी रद्द केली होती. सोबतच सर्व देशांना झिम्बाब्वेतून बाहेर काढण्यासाठी तशी व्यवस्था देखील केली जात आहे. ओमिक्रॉन विषाणू समोर आल्यानंतर कित्येक देशांनी तेथील विमानसेवा देखील स्थगित केली आहे.

दरम्यान, बाधित खेळाडूंना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली आहे का नाही हे अद्याप समोर आलेले नाही. शनिवारी श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामनाही रद्द करण्यात आला होता. महिला विश्वचषक पात्रता फेरी रद्द झाल्यानंतर क्रमवारीच्या आधारे बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज हे संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. तर महिला विश्वचषक पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये खेळवला जाणार आहे.

- Advertisement -

भारताचा अ संघ दक्षिण आफ्रिकेत

ब्लोमफोंटेनमध्ये भारताचा अ संघ आणि दक्षिण आफ्रिकेच्या अ संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान या मालिकेची सुरूवात १७ डिसेंबरपासून होणार आहे. पहिला कसोटी सामना जोहान्सबर्गमध्ये १७ डिसेंबरला खेळवला जाणार आहे. त्यानंतर २६ डिसेंबर आणि ३ जानेवारीला आणखी २ कसोटी सामने होणार आहेत. तर ११, १४, १६ जानेवारीला तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. दरम्यान एकदिवसीय सामन्यांची मालिका संपल्यानंतर १९, २१, २३ आणि २६ जानेवारीला ४ टी-२० सामने होणार आहेत.


हे ही वाचा: http://IND vs NZ 1st Test : भारतीय संघ मजबूत स्थितीत; शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी २८४ धावांचे आव्हान

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -