घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक विमानतळावर प्रवाशांचे स्क्रिनिंग

नाशिक विमानतळावर प्रवाशांचे स्क्रिनिंग

Subscribe

ओमिक्रॉनचा धोका - जिल्हाधिकार्‍यांचा सतर्कतेचा इशारा

नाशिक : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन रुपाने डोकेवर काढले असून, या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळावर येणार्‍या सर्व प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील अधिकार्‍यांची रविवारी (दि.28) बैठक घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेत आलेल्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनापेक्षा भयंकर असलेल्या हा विषाणू अवघे 5 ते 10 मिनिटांत पसरतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेप्रमाणे परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टिने प्रशासनाने तयारी सुरु केली असून, प्रथमत: परदेशातून येणार्‍या नागरिकांची तपासणी केली जात आहे.

- Advertisement -

तपासणीचा फार्स टाळण्यासाठी काही प्रवासी हे इतर देशातून भारतात येतात.भारतात येणार्‍या प्रवाशांची स्क्रिनिंग तातडीने सुरु करण्यात येणार आहे. नाशिक विमातळावर तातडीने स्क्रिनींग सुरु करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. मास्क वापरणे, गर्दी टाळणे यांसारख्या उपाययोजना सुरु केल्या जातील. टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार, हा विषाणू अतिशय भयंकर असून, तो लवकर बाधित करतो. त्यावर मात करण्यासाठी डबल मास्क वापरला पाहिजे. कोरोना लसीकरण हे बचावाचे अजून एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे नागरिकांनी त्वरीत लसीकरण पूर्ण केले पाहिजे. लसीकरणात नाशिकचा 14 वा क्रमांक आहे.

डेल्टा प्लस हा विषाणू आल्यानंतर तो आपल्याला उशिरा कळाला होता. त्यामुळे विदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी केली जाईल. पहिली लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येणार नाही, असे आपल्याला वाटले होते. परंतु, दुसर्‍या लाटेचे परिणाम अत्यंत भयंकर होते. तसेच आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणीही याकडे दुर्लक्ष करु नये, असा इशाराही जिल्हाधिकार्‍यांनी दिला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -