घरताज्या घडामोडीProsthetic Makeup: बॉलिवूडकरांना भावतोय प्रोस्थेटिक मेकअप

Prosthetic Makeup: बॉलिवूडकरांना भावतोय प्रोस्थेटिक मेकअप

Subscribe

बॉलिवूडमध्ये प्रोस्थेटिक मेकअपची जादू!

रणवीर सिंहच्या ८३ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सिनेमात कपिल देव यांची मुख्य भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंहने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ट्रेलरमध्ये दिसणारा रणवीस सिंह हा कपिल देवच आहे का असं वाटू लागलं. रणवीर सिंह हुबेहुब कपिल देव यांच्यासारखा दिसत आहे मग रणवीरची प्रत्यक्ष देहबोली असो वा सिनेमातील रणवीरचे डायलाॉग सगळ्यात कपिल देव यांची छलक दिसत आहे.

- Advertisement -

 

रणवीर सिंहच्या प्रोस्थेटिक मेकअपने ही सगळी जादू केली आहे. रणवीरच्या फेस कटपासून हेयरडोपर्यंत सगळ काही कपिल देव यांच्याशी मॅच होत आहे. रणवीरच्या या मेकअपमुळे तो खरंच रणवीर आहे की कपिल देव हे ओळखण कठीण होत आहे. ८३ हा कपिल देव यांच्यावरचा बायोपिक आहे. ८३च्या आधी देखील अनेक बायोपिक येऊन गेले त्यातील कलाकारांच्या लुक्सने प्रेक्षकांना हैराण केलं. बायोपिकमधील खरी व्यक्ती आणि सिनेमात त्याची व्यक्तिरेखा साकारणारे पात्र यांच्यातील साम्य पाहून प्रेक्षकांनी ही खरे आणि खोटं ओळखणं अवघड झालं होतं.

- Advertisement -

 

दीपिका पादुकोन – छपाक

सत्य घटनेवर आधारित छपाक हा सिनेमा २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकोन हिने अँसिडी हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रावल हिची भूमिका साकारली होती. सिनेमाचा ट्रेलर आला तेव्हाच प्रेक्षक दीपिकाला पाहून चकीत झाले होते. सिनेमात दीपिका पादुकोन रियल लक्ष्मीची कार्बन कॉपी दिसत होती. छपाकमधील दीपिकाचा प्रोस्थेटिक मेकअप करण्यासाठी दररोज ४ तास लागायचे.

विक्की कौशल – सॅम मानेकशॉ

अभिनेता विक्की कौशलचा अपकमिंग सिनेमा सॅम बहादुर. सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सरदार उधम यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे आणि सिनेमात विक्की कौशल सरदार उधम यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. सिनेमाचे पोस्ट लाँच झालं आहे ज्यात विक्की कौशलला अजिबात ओळखता येत नाहीये.  विक्की कौशल कोण आहे हे माहिती नसलेल्या व्यक्तिसमोर हा फोटो नेऊन ठेवला तर तो सारखाच वाटेल.

लारा दत्त – इंदिरा गांधी

याच वर्षी प्रदर्शित झालेला बेल बॉटम हा सिनेमा. या सिनेमात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका अभिनेत्री लारा दत्त हिने साकारली होती. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेकांनी इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली मात्र बेल बॉटममधील लारा दत्तने साकारलेल्या इंदिरा गांधी सर्वांच्या लक्षात राहणार आहेत. बॉलिवूडमध्ये आतापर्यंतच करण्यात आलेल्या सर्वात बेस्ट प्रोस्थेटिक मेकअप मधील हा एक मेकअप होता. या मेकअपसाठी मेकअप आर्टिस्ट्स विक्रम गायकवाड आणि संपूर्ण टीमला नॅशनल अवॉर्ड देण्यात आला होता. विक्रम गायकवाड यांनी भाग मिल्खा भाग, पीके,दंगल,उरी, शकुंतला देवी, पानीपत,सुपर ३० इतकच नाही तर अनेक मराठी सिनेमा आणि नाटकात देखील मेकअप केले आहेत.

अनुपम खेर – मनमोहन सिंह

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या सिनेमात देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भूमिका साकारली होती. मनमोहन सिंह यांच्या चेहऱ्यातील लहान लहान गोष्टी अनुपम खेर यांच्यावर प्रोस्थेटीक मेकअपद्वारे दाखवण्यात आल्या होत्या. मनमोहन सिंह यांच्या दिसण्यापासून बोलण्या चालण्यापर्यंत सगळ्या शेड्स अनुपम खेर यांनी उत्तमरित्या दाखवल्या होत्या.

रणबीर कूपर – संजू

अभिनेता संजय दत्त याच्यावर आलेल्या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूरला केलेला प्रोस्थेटिक मेकअप देखील उत्तम प्रोस्थेटिक मेकअप पैकी एक होता. प्रोस्थेटिक मेकअपमुळे रणबीर कपूर डिट्टो संजय दत्त वाटत होता. सिनेमाचा ट्रेलरपाहून प्रेक्षक शॉक झाले होते. सिनेमात संजय दत्तच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास दाखवण्यात आला होता. त्यामुळे रणबीरला संजय दत्तच्या प्रत्येक वयातील भूमिका दाखवायची होती. प्रत्येक वयातील संजय दत्तसारखा लुक रणबीरवर साकारण हा खरंच मोठा टास्क होता.

 


हेही वाचा – Sidharth Shuklaच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा हसताना दिसली शेहनाज गिल

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -