घरपालघरदक्षिण आफ्रिकेतून आलेले नऊ प्रवाशी निगेटीव्ह

दक्षिण आफ्रिकेतून आलेले नऊ प्रवाशी निगेटीव्ह

Subscribe

मीरा भाईंदर शहरात दक्षिण आफ्रिकेतून आलेले नऊही प्रवाशी आणि त्यांचे जवळचे नातलग निगेटीव्ह आले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार नऊही जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मीरा भाईंदर शहरात दक्षिण आफ्रिकेतून आलेले नऊही प्रवाशी आणि त्यांचे जवळचे नातलग निगेटीव्ह आले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार नऊही जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ९ प्रवाशांची यादी मिरा भाईंदर महापालिकेला मिळाली होती. ती यादी मिळताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ९ प्रवाशी व त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या नातेवाईकांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली. संबंधित ९ प्रवाशी व त्यांच्या नातेवाईकांचा कोव्हिड अहवाल निगेटिव्ह आला आहे. अहवाल निगेटिव्ह आला असला तरीसुद्धा संबंधित ९ प्रवाशांना शासनाच्या निर्देशानुसार विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकन ओमायक्रॉन या नव्या संभाव्य व्हेरियंटचा धोका पाहता मिरा भाईंदर शहरातील सर्व सोसायटीच्या परिसरात, सोसायटीमध्ये मागील १५ दिवसांत किंवा येणार्‍या काळात एखादा व्यक्ती हा परदेशातून आला असेल. तर महापालिका वॉररूम ०२२-२८१४१५१६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून त्या व्यक्तीची माहिती देण्यात यावी. जेणेकरून मिरा भाईंदर शहरात दक्षिण आफ्रिकन ओमायक्रॉन या नव्या संभाव्य व्हेरियंटचा प्रसार जास्त प्रमाणात थांबण्यासाठी महापालिकेला शक्य होईल, असे पत्र शहरातील सर्व सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकन ओमिक्रॉन या नव्या संभाव्य व्हेरियंटचा धोका पाहता शहरातील सर्व नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा. वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे. सामाजिक अंतराचे पालन या त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी व शासकीय तसेच खासगी केंद्रांवर सुरू असलेल्या ठिकाणी लसीचे दोन्ही डोस घेऊन स्वतःला पूर्ण संरक्षित करावे. तसेच मिरा भाईंदर शहरात दक्षिण आफ्रिकन ओमायक्रॉन या नव्या संभाव्य व्हेरियंटबाबत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करून मिरा भाईंदर महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा –

Petrol Price : केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय: दिल्लीत पेट्रोल ८ रुपयांनी स्वस्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -