घरमनोरंजनएअरपोर्टवर 'गली बॉय' फेम विजय वर्मा अन् दीपिकाची अचानक भेट, दोघांच्या सेल्फीवर...

एअरपोर्टवर ‘गली बॉय’ फेम विजय वर्मा अन् दीपिकाची अचानक भेट, दोघांच्या सेल्फीवर रणवीरची रिअ‍ॅक्शन

Subscribe

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडमधील सर्वात फेमस आणि क्यूट कपल्सपैकी एक आहेत. दोघ सोशल मीडियावरही बरेच अॅटिव्ह असतात. त्यामुळे दोघांच्या प्रत्येक छोट्या गोष्टीचीही सर्वाधिक चर्चा रंगते. दीपिका नाही तर रणवीर सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रिटींच्या फोटो, व्हिडिओवर कमेंट करताना पाहायला मिळतो. यातील दीपिकाच्या फोटोंवरील रणवीरच्या कमेंट्स अनेक चाहत्यांची मनं जिंकतात. रणवीरने दीपिकाच्या फोटोवर केलेली अशीच एक कमेंट आत्ता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही एक कमेंट सर्वांसाठी हेडलाईन बनत आहे. मात्र या फोटोमध्ये दीपिका एकटी नसून तिच्यासोबत रणवीरचा एक खास मित्र आहे.

विजय वर्माने शेअर केला फोटो

दीपिका पादुकोण शनिवारी मुंबई एअरपोर्टवरून हैदराबादला जात होती, यावेळी अचानक तिची ‘गली बॉय’ फेम विजय वर्मा याच्याशी भेट झाली. दीपिका अचानक भेटल्याचा आनंद विजयच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यावेळी थोडाही वेळ न घालवता विजय शर्माने दीपिकासोबत एक सुंदर सेल्फी घेतला. हा सेल्फी त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर केला. या फोटोसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, पाहा एअरपोर्टवर मी कोणाला धडकलो. सर्वात बेस्ट. विजयने पुढे रणवीर सिंहबद्दल लिहिले की, बाबा याद आ गए.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Varma (@itsvijayvarma)

- Advertisement -

विजयच्या फोटोवर रणवीर सिंगची कमेंट

विजय वर्माचा दीपिकासोबतचा फोटो पाहून रणवीर सिंग कमेंट केल्याशिवाय राहू शकला नाही. रणवीरने या दोघांच्या फोटोवर मजेशीर कमेंट करत लिहिले की – ‘एक ब्युटी अँड एक क्युटी.’ रणवीरची ही कमेंट आत्ता अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरतेय. मात्र रणवीरची फोटोंना कमेंट करण्याची पद्धती काही तरी युनिकचं असते.

- Advertisement -

दीपिका आणि विजय शर्माच्या एअरपोर्ट लूकबद्दल बोलायचे झाल्यास, दीपिका यावेळी जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या प्रोफेशनल आणि फॉर्मल आऊटफिटमध्ये दिसली. दीपिकाचा हा अगदी सिंपल लूक अनेकांना भावला. तर विजय वर्माने लाल आणि पांढऱ्या रंगाच्या चेक्स शर्ट आणि पॅन्टमध्ये दिसला.

अशी झाली अचानक भेट

एकीकडे विजय वर्मा दिल्लीला जात होता तर दीपिका हैदराबादचे प्लाइट पकडण्यासाठी जात होती. दीपिका तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात होती. याचवेळी विजय आणि दीपिका यांची अचानक भयानक भेट झाली. दीपिकाच्या तिच्या आगामी चित्रपटात प्रभाससोबत दिसणार आहे. दीपिका आणि प्रभास पहिल्यांदाच बिग स्क्रीन एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चनही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नाग अश्विन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हैदराबादला पोहचताच दीपिकाचे अगदी पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात याचा एक व्हिडिओ दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला होता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -