घरमहाराष्ट्रनाशिकउत्तर महाराष्ट्र साहित्य परिषदेची होणार स्थापना

उत्तर महाराष्ट्र साहित्य परिषदेची होणार स्थापना

Subscribe

संमेलनानंतर साहित्यिकांचा एकजुटीचा नारा

नाशिक: शहरात झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिकांनी एकजुटीचा नारा दिला आहे. साहित्यिक नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना करणार आहे. त्यासाठी घडामोडींना वेग आला असून, घटनापत्रक व नियमावली तयार केली जात आहे.

नाशिकमध्ये ३, ४ व ५ डिसेंबर रोजी साहित्य संमेलन निर्विघ्नपणे पाडले. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिक एकत्र आले होते. संमेलनात उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्यावर साहित्यिकांमध्ये चर्चा झाली. साहित्यिकांनी साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांवर चर्चा केली. सध्या मराठी साहित्य महामंडळाच्या सहा घटक संस्था आहेत. यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, विदर्भ साहित्य संघ, नागपूर, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, मुंबई मराठी साहित्य संघ, बृहन्महाराष्ट्र साहित्य परिषद, गोवा साहित्य परिषदेचा समावेश आहे.

- Advertisement -

शिवाय, उत्तर महाराष्ट्रातून नाशिक आणि नाशिकरोड या दोन शाखा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या आधिपत्याखाली काम करत आहेत. भौगोलिकदृष्ठ्या सर्वाधिक मोठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आहे. या परिषदेशी संपर्क साधणे साहित्यिकांना अनेक अडचणी येत आहेत. परिणामी, उत्तर महाराष्ट्रात साहित्य परिषदेचे कामकाज दिसून येत नाही. या संस्थेचे विकेंद्रीकरण झाल्यास उत्तर महाराष्ट्रात साहित्यिक आणखी वाढतील. मराठी भाषा आणि साहित्य चळवळीला वेग मिळेल, असे उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिकांना वाटत आहे. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांची नुकतीच नाशिकमधील एका हॉटेलमध्ये बैठकसुद्धा झाली आहे. उत्तर महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाल्यास नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदूरबार या जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील हे साहित्य संमेलनानिमित्त नाशिक मुक्कामी असताना साहित्यिकांनी त्यांची भेट घेत संवाद साधला आहे. त्यानुसार घडामोडींना वेग आला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -