घरक्रीडाPAK vs WI: पाकिस्तान दौऱ्यावर पोहोचलेल्या वेस्टइंडीज संघाच्या ४ खेळाडूंना कोरोनाची लागण;...

PAK vs WI: पाकिस्तान दौऱ्यावर पोहोचलेल्या वेस्टइंडीज संघाच्या ४ खेळाडूंना कोरोनाची लागण; संपूर्ण दौऱ्याला मुकणार

Subscribe

पाकिस्तान आणि वेस्टइंडीजमध्ये १३ डिसेंबरपासून ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे

पाकिस्तान आणि वेस्टइंडीजमध्ये १३ डिसेंबरपासून ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही मालिका पाकिस्तानच्या धरतीवर पार पडणार आहे त्यामुळे वेस्टइंडीजचा संघ पाकिस्तानला दाखल झाला आहे. मात्र मालिकेच्या पूर्वसंध्येलाच वेस्टिंडीजच्या संघाला मोठा झटका बसला आहे. दरम्यान दोन्हीही संघातील मालिकेला पुढील आठवड्यापासून सुरूवात होणार आहे पण त्यापूर्वी मालिकेला कोराना विषाणूचे गालबोट लागले आहे. कारण वेस्टइंडीजच्या संघातील चार खेळाडू कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले आहे. विंडीजच्या संघातील शेल्डन कॉट्रेल, अष्टपैलू रोस्टन चेज आणि गोलंदाज काइल मेयर्स यांना १० दिवसांसाठी बायो-बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. या तीनही खेळाडूंचा समावेश टी-२० संघात होता. तर रोस्टन चेज एकदिवसीय संघाचा देखील भाग होता. दरम्यान वेस्टइंडीजच्या संघातील आणखी एक व्यक्ती कोरोना संक्रमित आढळला असून तो स्टाफ सदस्य आहे.

क्रिकेट विंडीजने ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार संघातील सर्व खेळाडूंना लस देण्यात आली आहे. मात्र तरी देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मात्र दिलासादायक म्हणजे ज्या खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे त्यापैकी कोणालाही कोरोनाची जास्त लक्षणे दिसत नाहीत. सोबतच संघातील अन्य खेळाडू आणि सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

- Advertisement -

दरम्यान विंडीजच्या पाकिस्तान दौऱ्याची सुरूवात टी-२० मालिकेने होणार आहे. पहिला सामना सोमवारी १३ डिसेंबरला सुरू होईल. हा सामना पाकिस्तानच्या कराचीत होणार आहे. तर टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी विडींजच्या संघात रोवमॅन पावेलला संधी मिळाली आहे. यावेळी कर्णधार कायरन पोलार्ड दुखापतग्रस्त असल्यामुळे मर्यादित षटकांच्या सामन्यांत संघाचा भाग नसणार आहे.

- Advertisement -

कर्णधार कायरन पोलार्डच्या गैरहजेरीत निकोलस पूरनकडे टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे. तर शाई होप एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार असणार आहे. शाई होप प्रथमच एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे कर्णधारपद भूषवणार आहे.


हे ही वाचा : http://Yuvraj Singh Birthday : सिक्सर किंगला’ ४० वर्ष पूर्ण; त्याचा विश्वविक्रम आजही आहे अविस्मरणीय


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -