घरताज्या घडामोडीएसटीत मोठा भ्रष्टाचार; तो थांबला तरच प्रश्न सुटेल

एसटीत मोठा भ्रष्टाचार; तो थांबला तरच प्रश्न सुटेल

Subscribe

नाशिक दौऱ्यात राज ठाकरे यांनी साधला निशाणा, संपाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याची माहिती

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यास गरजेचा आहे. मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न समजून घेतला पाहिजे. एसटी महामंडळातील भ्रष्टाचार थांबल्याशिवाय सेवा चांगली चालणार नाही, असे सांगतानाच भ्रष्टाचाऱ्यांना त्यांचे पैसे आले नाही तर त्यांचा जीव कासावीस होतो, असा थेट आरोपही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर केला. लोकांच्या हितासाठी तुम्हाला राज्य दिलंय. निदान त्याचा तरी विचार व्हावा. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, मनसेच्या काळातील नाशिकमधील प्रकल्पांचा बोजवारा उडाल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, नाशिककरांना प्रकल्प जपता आले नाहीत, हे दुर्दैवं आहे. यापुढे चांगल्या शहरांची अपेक्षा करणं सोडून द्यावं लागेल, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्राला ६० वर्षे शरदचंद्र दर्शन

शरद पवारांना आपण ८१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बुके पाठवला. राजकारणात तब्बल ६० वर्षे महाराष्ट्र शरदचंद्र दर्शनच करतोय. शरद पवारांना आपण फोनद्वारे शुभेच्छा दिल्या. या वयातही ते काम करतात, हे विलक्षण असल्याचे गौरवोद्गारही राज ठाकरेंनी काढले. राजकीय मतभेद आणि वैयक्तिक संबंध हे वेगवेगळे असतात. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटल पाहिजे, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

- Advertisement -

जाती-पातीत महाराष्ट्र खितपत पडावा अशी अनेकांची इच्छा

ओबीसी आरक्षणाचा विषय हा वरवर दिसतो तितका सोपा नाही. महाराष्ट्र जातीपातीतच खितपत पडावा, असं अनेकांना वाटतं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. आजही अंबानींच्या घराखाली गाडी कशासाठी ठेवली गेली, ही गाडी कुणी ठेवली याचा तपास राहिला बाजूला आणि देशमुखांना तुरुंगात टाकलं, असंही त्यांनी सांगितलं.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -