घरताज्या घडामोडीCDS: लष्कर प्रमुख जनरल नरवणे नवे सीडीएस? चीफ ऑफ स्टाफ कमिटीचा स्वीकारला...

CDS: लष्कर प्रमुख जनरल नरवणे नवे सीडीएस? चीफ ऑफ स्टाफ कमिटीचा स्वीकारला पदभार

Subscribe

लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांच्या चीफ ऑफ स्टाफ डिफेंस (सीडीएस) होण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर पुढील सीडीएस नरवणे होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. जनरल नरवणे यानी चीफ ऑफ स्टाफ कमिटीचा पदभार स्वीकारला आहे. या कमिटीमध्ये तिन्ही दलांचा समावेश असतो. नरवणे सर्व सेनाप्रमुखांमध्ये वरिष्ठ असल्यामुळे त्यांना सीडीएस कमिटीच्या चेयरमनपदी नियुक्त करण्यात आलं आहे.

सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे ८ डिसेंबरला तामिळनाडूत हेलीकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर पुढील सीडीएस कोण होणार याबाबत चर्चा आहे. मात्र सीडीएस होण्यासाठी चीफ ऑफ स्टाफ कमिटीचा अध्यक्ष व्हावे लागते. यामुळे नरवणे पुढील सीडीएस होण्यामागील हालचालींना वेग येत आहे. लडाखमधील तणावात्मक परिस्थिती आणि इतर प्रश्नांच्या आधारावर सीडीएसपदी जनरल नरवणे यांची नियुक्ती करण्यात येण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. जनरल नरवणे हे तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांमध्ये सर्वाधिक वरिष्ठ जनरल आहेत.

- Advertisement -

भारतीय वायुसेनेचे चीफ एयर चीफ मार्शल वीआर चौधरी आणि नौसेनेचे प्रमुख एडमिरल आर हरि कुमार यांनी ३० सप्टेंबरला आणि ३० नोव्हेंबरला पदभार स्वीकारला होता. तर जनरल नरवणे यांनी ३१ डिसेंबर २०१९ मध्ये लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता आणि येत्या एप्रिल महिन्यात ते निवृत्त होणार आहेत. सैन्यातील अनुभवामुळे जनरल मनोज नरवणे सीडीएस पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

कोण आहेत जनरल मनोज नरवणे

– जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देशाचे २८ वे लष्करप्रमुख

- Advertisement -

– मनोज नरवणे यांचे पुण्यातील ज्ञानप्रबोधीनी शाळेत सुरुवातीचे शिक्षण झाले.

– पुण्यातील एनडीएमधून त्यांनी लष्कराचे शिक्षण घेतलं.

– एनडीएनंतर त्यांनी डेहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीत प्रशिक्षण घेतलं.

– जून १९८० मध्ये सातव्या शीख लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले.

– नंतर आसाम रायफल्सचे महानिरीक्षक, जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख म्हणून काम

– ईशान्य भारत आणि जम्मू काश्मीरमध्ये बंडखोरांविरुद्ध कारवाई करण्याचा अनुभव देखील नरवणेंना आहे.

– ३९ वर्षांच्या लाष्करी सेवेत राष्ट्रीय रायफल्स, स्ट्राईक कॉर्प्स, लष्करी प्रशिक्षण कमांडचं नेतृत्व

– जनरल नरवणेंना कारगिल युद्धाचा अनुभव आहे.


हेही वाचा : Vijay Diwas 2021: भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करुन दिलं बांगलादेशला स्वातंत्र्य, ९३ हजार सैनिकांनी पत्करली शरणागती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -