घरCORONA UPDATEOmicron Variant: ओमिक्रॉनने चिंता वाढवली, डेल्टापेक्षा ७० पट वेगाने पसरतो नवा व्हेरियंट

Omicron Variant: ओमिक्रॉनने चिंता वाढवली, डेल्टापेक्षा ७० पट वेगाने पसरतो नवा व्हेरियंट

Subscribe

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटशी संबंधित एका नवीन अभ्यासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यातून एक गोष्ट दिलासा देणारी आहे, तर दुसरी चिंता वाढवणारी आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंट आणि कोविडच्या मूळ स्ट्रेनपेक्षा ७० पट वेगाने पसरतो. तथापि, दिलासा देणारी बाब ही आहे की या व्हेरियंटचा संसर्ग गंभीर होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हा अभ्यास हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की ओमिक्रॉन डेल्टा आणि कोविडच्या मूळ स्ट्रेनपेक्षा ७० पट वेगाने पसरतो किंवा संक्रमित करतो. याचा अर्थ असा आहे की मागील प्रकारापेक्षा ते मानवांमध्ये अधिक वेगाने पसरू शकतो.

- Advertisement -

या अभ्यासानुसार, कोरोनाचा एक नवीन प्रकार म्हणजेच ओमिक्रॉन मानवाच्या श्वसनसंस्थेवर परिणाम करतो. ओमिक्रॉन मानवांच्या श्वसननलीकेवर हल्ला करतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ओमिक्रॉनमुळे फुफ्फुसाचा संसर्ग होण्याची शक्यता कोरोनाच्या मूळ स्ट्रेनपेक्षा कमी आहे. याचा अर्थ अधिक प्रकरणे समोर येऊ शकतात, परंतु त्यात गंभीर प्रकरणे कमी असतील.

हाँगकाँग विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक मायकेल चॅन ची-वाई यांनी त्यांच्या टीमसोबत हा अभ्यास केला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट वेगळा केला आहे आणि त्याची मूळ स्ट्रेन आणि डेल्टा व्हेरियंटशी तुलना केली आहे. त्यात टीमला असे आढळले की ओमिक्रॉन व्हेरियंट मूळ स्ट्रेन आणि डेल्टा पेक्षा अधिक वेगाने तयार होतो. अभ्यासात असे आढळून आले की संसर्गानंतर २४ तासांनंतर, ओमिक्रॉन मूळ व्हायरस आणि डेल्टा प्रकारापेक्षा ७० पट वेगाने पसरतो. परंतु त्याचा प्रभाव १० पटीने कमी आहे, त्यामुळे गंभीर लक्षणांसह कोरोना होणार नाही असा अंदाज वर्तवला जात आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत ओमिक्रॉनचे एकूण ७८ रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉन व्हिरियंट भारतातील ११ राज्यांमध्ये पसरला आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -