घरदेश-विदेशLive Update : निर्माता पराग संधवींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

Live Update : निर्माता पराग संधवींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

Subscribe

निर्माता पराग संधवींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक


रवींद्र वायकर यांची ईडीकडून ८ तास चौकशी

- Advertisement -

अधिवेशनाला मुख्यमंत्री स्वतः हजर राहणार आहेत – अजित पवार


ओबीसी आरक्षणाबाबत सरकार कुठेही कमी पडलेले नाही – अजित पवार

- Advertisement -

आमदारांचं निलंबन हे डोक्यात ठेवून केलेलं नाही. सभागृहात जी परिस्थिती निर्माण झाली त्यावरून निलंबन करण्यात आलं.


चहापानावर एवढा बहिष्कार टाकल्याचे आठवत नाही – अजित पवार


कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे कमी कालावधीचं अधिवेशन होणार. शुक्रवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक घेणार आहोत. त्यामध्ये पुढे किती दिवस अधिवेशन घ्यायचं यावर निर्णय होईल. या अधिवेशनात 5 प्रलंबित,आताची 21 विधेयक एकूण 26 विधेयक अधिवेशनात आणणार. शक्ती कायदा विधेयक या अधिवेशनात आणणार  – अजित पवार


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे मुंबईत हिवाळी  अधिवेशन घ्यावं लागेल – अजित पवार


पुढचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्येच होणार – अजित पवार


कमी वेळात अधिवेशन घेऊन लोकशाही कुलूपबंद करण्याचा सरकारचा प्रयत्न, वर्षभरासाठी आमदारांना निलंबित करणे गे लोकशाहीला काळीमा फासणारे आहे, सरकारकडून ओबीसी आरक्षण गुंडाळण्याचा प्रयत्न, राज्यात सुलतानी पद्धतीने वीज तोडणी, वीज बिल वसूलीचे काम होत आहे, आमदारांवर विश्वास नाही म्हणून विश्वास बदलले, परीक्षा घोटाळा प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, ओबीसी आरक्षण सरकारमुळे गेलं – देवेंद्र फडणवीस


पुणे जमीन खरेदी गैरव्यवहारा प्रकरणी मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा, एकनाथ खडसे सत्र न्यायालयात हजर


दिल्लीत विरोधकांचा फॅग मार्च सुरु, गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेणी यांचा राजीनामा घ्या, संजय राऊतांची मागणी


विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेपाठोपाठ लोकसभेचा कामकाज स्थगित


10 देवस्थानांच्या जमिनी भाजप नेत्यांनी लाटल्या, मलिकांनी दिले पुरावे


टीईटी पेपर फुटी प्रकरणी बीडमधून एकाला अटक , आरोपींनी खोटी प्रमाणपत्रे जाहीर केली


महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांना पुणे पोलिसांकडून अटक, जीए टेक्नॉलॉजी प्रमुखालाही अटक,


राज्यातील नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान; ओबीसी आरक्षणाशिवाय होतेय निवडणूक, भंडारा आज जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या नगरपंचायती व ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी प्रयागराज दौर्‍यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दोन लाखांहून अधिक महिलांच्या एका अनोख्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. यावेळी मोदी महिला बचत गटांच्या (SHGs) खात्यांमध्ये जवळपास १० अब्ज रूपयांची रक्कम हस्तांतरित करणार आहेत, याचा सुमारे १६ लाख महिला सदस्यांना फायदा होईल.
या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहणार आहेत. सीएम योगी 1:30 ते 1:50 पर्यंत भाषण देतील, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 1.51 ते 2.20 या वेळेत जाहीर सभेला संबोधित करतील.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -