घरताज्या घडामोडीDelhi Pollution : दिल्लीत ओमिक्रॉन आणि थंडीसह प्रदूषणाचा कहर, घरी राहण्याचा तज्ज्ञांचा...

Delhi Pollution : दिल्लीत ओमिक्रॉन आणि थंडीसह प्रदूषणाचा कहर, घरी राहण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Subscribe

दिल्लीत ओमिक्रॉन आणि थंडीसह प्रदूषणाने कहर केला आहे. दिल्लीसह देशात सुद्धा कोरोना व्हारयसच्या नव्या व्हेरियंटने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. तसेच दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा पारा वाढला आहे. शुक्रवारी दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, अशा प्रकारचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

दिल्लीच्या अनेक भागांत हवेची गुणवत्ता प्रचंड खराब आहे. दिल्लीतील नोएडा आणि जवळच्या परिसरात सुद्धा हालाकिची परिस्थिती आहे. नोएडामध्ये पीएम १० ची पातळी ५७० च्यावर पोहोचली आहे. तर दिल्लीमध्ये पीएमची पातळी २.५ इतकी असल्यामुळे एकूण एआयक्यूची पातळी ४२५ च्या वर पोहोचली आहे. दिल्लीतील आनंद विहार परिसरात AQI ची पातळी ४६९ इतकी आहे.

- Advertisement -

राजधानी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खराब

राजधानी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता खराब आहे. दिल्लीतील तापमान पाहिलं असता २४ डिग्री आहे. तर अधिकतर तापमान ६ डिग्री इतकी नोंद करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये दिवाळीच्या आसपास प्रदूषण प्रचंड खराब होतं. एक्यूआयची पातळीत वाढ होताना दिसत आहे. केंद्र सरकार ते दिल्ली सरकारपर्यंत सुप्रीम कोर्टाकडून लक्ष देण्याचं आवाहन देण्यात आलं आहे. कारण राजधानीत मुलांची शाळा देखील बंद आहे. त्याचप्रमाणे मागील दिवसांमध्ये सरकारकडून निर्बंध लावण्यात आले आहेत.

दरम्यान, दिल्लीतील नोएडा, ग्रेटर नोएडा, गाजियाबाद आणि फरीदाबाद यांसारख्या भागांमध्ये रेड झोन अलर्ट करण्यात आला आहे. तर द्वारका, आरके पुरम, आयानगर आणि नजफगढ रेड झोन बाहेर आहेत. गुरूवारी दिल्लीतील एनसीआरमध्ये रेड झोन जारी करण्यात आला होता. परंतु नोएडा आणि फरीदाबादमध्ये प्रदूषणाने धुमाकूळ घातला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Maharashtra Assembly Winter Session 2021: अधिवेशनात ३२ हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मान्य करण्यात राज्य सरकारला रस, चंद्रकांत पाटलांचा आरोप


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -