घरक्रीडासूर्यकुमार यादवने जिंकली चाहत्यांची मनं, उत्कृष्ट खेळीमुळे मिळाला 'मॅन ऑफ द मॅच'चा...

सूर्यकुमार यादवने जिंकली चाहत्यांची मनं, उत्कृष्ट खेळीमुळे मिळाला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार

Subscribe

भारतीय संघाचा वेगवान फलंदाज सूर्यकुमार यादवने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सूर्यकुमारला उत्कृष्ट खेळीमुळे ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला आहे. मंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पोलीस शिल्ड क्रिकेट टूर्नामेंटच्या अंतिम सामन्यात २४९ धावा पूर्ण केल्या होत्या. त्याने क्लब पारसी जिमखानाकडून पायेड स्पोर्ट्स क्लबच्या विरूद्ध उत्तम खेळी केली होती. त्यामुळे यादवला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय फलंदाजाने आपला पुरस्कार एका स्थानिक मैदानातील स्टाफला (ग्राऊंडमॅन) देण्याचा निर्णय घेतला. यादवने सामन्यानंतर सांगितलं की, मैदानातील स्टाफच्या योगदानाकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं.

सूर्यकुमार यादवने एका इंग्रजी वृत्तपत्राशी संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला की, मैदानावरील स्टाफच्या योगदानाबाबत जास्त काहीही वक्तव्य किंवा त्यांची स्तुती केली जात नाही. ती मैदानात येणारी पहिली व्यक्ती असते. ते सकाळी साडेसहा वाजता मैदानात येतात. पिच तयार करतात. या सर्व गोष्टी माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत. जेव्हा मी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. तेव्हा मला नेट्सवर फलंदाजी करावी लागत होती. त्यावेळी मी ग्राऊंडमॅन (स्टाफ) आणि माझ्या काही मित्रांसोबत पिच रोल करायचो. ही लोकं कोणाच्याही लक्षात येत नाहीत. तसेच त्यांची स्तुतीही कोणी करत नाहीत. आम्ही आमची नावं कागदावर पाहतो. परंतु कोणीही त्यांना धन्यवाद देखील बोलत नाही.

- Advertisement -

स्थानिक क्रिकेट खेळण्यास कधीही रेडी…

सूर्यकुमार यादवचा मुंबईतील महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघाकडून लवकरच घोषणा केली जाणार आहे. अशातच यादवने क्लब पारसी जिमखानासाठी तीन दिवसीय अंतिम सामना खेळण्याचा निर्णय घेतला होता. ३१ वर्षीय सूर्यकुमार अद्यापही स्थानिक क्लबसाठी खेळण्यास पसंती दर्शवतो.


हेही वाचा : महात्मा गांधींना शिवीगाळ करणाऱ्या कालीचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नाना पटोलेंची मागणी

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -