घरताज्या घडामोडीRanjish Hi Sahi : वूट सिलेक्ट 'रंजिश ही सही' चा ट्रेलर...

Ranjish Hi Sahi : वूट सिलेक्ट ‘रंजिश ही सही’ चा ट्रेलर लॉंच

Subscribe

यशस्‍वी रोमँटिक सुपरहिट चित्रपट सादर करण्‍याचा ट्रॅक रेकॉर्ड असलेले मुकेश भट्ट आणि जिओ स्‍टुडिओज एकत्र त्‍यांचा पहिला डिजिटल व्हेंचर ‘रंजिश ही सही’ सादर करत आहे. ही सिरीज वूट सिलेक्‍टवर पाहायला मिळेल. महेश भट्ट निर्मित आणि पुष्‍पदीप भारद्वाज यांचे दिग्‍दर्शन असलेल्‍या या एपिक रोमँटिक ड्रामा सिरीजमध्‍ये ताहिर राज भसिन, अमृता पुरी आणि या सिरीजच्‍या माध्‍यमातून बॉलिवुड पदार्पण करत असलेली अमला पॉल प्रमुख भूमिकेत आहेत.

क्‍लासिक १९७० च्‍या दशकामध्‍ये स्थित ‘रंजिश ही सही’ शंकर (ताहिर), आमना (अमला) आणि अंजू (अमृता) यांच्‍या जीवनाच्‍या अवतीभोवती फिरते. जटिल त्रिकूट, जेथे नवोदित चित्रपट दिग्‍दर्शकाला गतकाळातील ए लिस्‍ट बॉलिवुड अभिनेत्रीबाबत आत्‍मचरित्र सापडते, ज्‍यामुळे त्‍याची पत्‍नी स्‍तब्‍ध होते आणि तो दोन विश्‍वांमध्‍ये अडकून जातो. शंकर भावना व गोंधळाचा गुरफटलेला हा धागा सोडवू शकेल का?

- Advertisement -

उत्कटता, मोह, ध्यास, प्रेम, विश्‍वास, दुरावा, गौरव आणि स्टारडम यांनी भरलेल्या या निषिद्ध प्रेमाची अद्वितीय कथा आहे.  एपिक रोमँटिक ड्रामा सिरीज ‘रंजिश ही सही’ वूट सिलेक्टवर पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा – Shahrukh Khan: चार वर्षांनी किंग खान शाहरुखचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -