घरमहाराष्ट्रराणेंच्या पाठीमागे भाजप खंबीरपणे उभी; देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावलं

राणेंच्या पाठीमागे भाजप खंबीरपणे उभी; देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावलं

Subscribe

संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणेंचा शोध घेत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. यावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच, नारायण राणे यांच्या पाठीमागे भाजप खंबीरपणे उभी आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला ठणकावून सांगितलं.

पोलीस ज्या प्रकारे एकांगी वागत आहेत, या महाराष्ट्रातल्या दरोडेखोरांना पकडायला त्यांना वेळ नाही. बलात्काऱ्यांना पकडायला त्यांना वेळ नाही. महाराष्ट्रात जे लोक वेगवेगळ्या प्रकारचे अपराध करतात त्यांना पकडायला वेळ नाही. पण नारायण राणेंच्या घरी जाऊन नोटीस द्यायला त्यांना वेळ नाही. जे काही चाललं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही नारायण राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

सरकार तालिबान्यांसारखे वागतंय – आशिष शेलार

आमदार नितेश राणेंचा शोध घेत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले असून महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप आमदार ॲड. आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. आशिष शेलार यांनी हे सरकार तालिबान्यांसारखे वागत असल्याची घणाघाती टीका शेलारांनी केली.

नारायण राणे यांना पाठवलेल्या नोटीसवरुन ॲड. आशिष शेलार यांनी ट्विट करत टीका केली. “कोणत्याही प्रकारची चूक केली नसताना, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्राचे पोलीस नोटीस बजावून आमच्या समोर येऊन उभे रहा असे आदेश देतात…वारे वा..ठाकरे सरकार! फुले, शाहू, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे! अशी खरमरीत टीका ठाकरे सरकारवर आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – फुले, शाहूंचं नाव घ्यायचं अन् तालिबान्यांसारखे वागायचं, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर घणाघात


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -