घरताज्या घडामोडीYear Ender 2021: सूर्यवंशी ते अंतिम, 'या' सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर केली तगडी...

Year Ender 2021: सूर्यवंशी ते अंतिम, ‘या’ सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर केली तगडी कमाई

Subscribe

बॉलिवूडमध्ये २०२० वर्षात अनेक बिग बजेट आणि बहुप्रतिक्षित सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. बॉलिवूड स्टार्सचा जलवा यंदा प्रेक्षकांना पाहता आला. अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. कोरोनामुळे थिएटर्स अनेक महिने बंद होती. त्यामुळे अनेक सिनेमे रिलीजसाठी रखडले होते. त्यामुळे अनेक सिनेमांनी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे मोर्चा वळवला त्यामुळे निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रेक्षक थिएटर्सकडे वळतील की नाही अशी शंका होती. मात्र सगळ्या शंका फोल ठरवत प्रेक्षकांनी थिएटर्समध्ये सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली आणि सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. सूर्यवंशी ते अंतिम पर्यंत बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणारे सिनेमे कोणते आहेत जाणून घ्या.

सुर्यवंशी

- Advertisement -

कोरोनामुळे सतत लांबणीवर पडलेला अक्षय कुमारचा सुर्यवंशी हा सिनेमा ५ नोव्हेंबर २०२१ला रिलीज करण्यात आला. रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षीत सुर्यवंशी हा सिनेमा २०२१मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. सिनेमाचे बजेट १६० करोड रुपये होते मात्र सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २९३.३४ करोड रुपयांचा गल्ल जमवला. अक्षय कुमार, कतरिना कैफ, रणवीर सिंह हे मुख्य कलाकार सिनेमात होते.

अंतिम


सलमान खानच्या बॅनरखाली तयार झालेला आणि महेश मांजरेकर दिग्दर्शीत अंतिम हा सिनेमा देखील २०२१मध्ये चांगलाच गाजला. २६ नोव्हेंबर २०२१ला सिनेमा रिलीज झाला. अंतिम या थ्रिलर सिनेमाने ५८.२६ करोड रुपयांची कामाई केली. या सिनेमा जगभरात पाहिला जातोय. त्यामुळे या सिनेमाची एकूण बॉक्स ऑफिस कमाई आणखी वाढणार आहे.

- Advertisement -

बेलबॉटम

२०२१मध्ये खिलाडी अक्षय कुमारच्या दोन सिनेमांची चर्चा होती. एक म्हणजे सुर्यवंशी आणि दुसरा बेल बॉटम. २०२१ वर्षातील सर्वात कमाई करणारा बेलबॉटम हा तिसरा सिनेमा ठरला आहे. अक्षय कुमार, लारा दत्ता, हुमा कुरैशी आणि वाणी कपूर या मुख्य भूमिकेत होते. अक्शन आणि थ्रीलरने भरलेल्या या सिनेमाने एकूण ५०.५८ करोड रुपयांची कमाई केली. बेलबॉटमने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २.७५ करोडचा गल्ला जमावला होता.

तडप

रोमँटिक अक्शनने भरलेला तडप हा सिनेमा देखील २०२१मधील चौथा सर्वात कमाई करणारा सिनेमा ठरला. ३ डिसेंबर २०२१ला सिनेमा रिलीज करण्यात आला. आतापर्यंत या सिनेमाने ३३.९० करोड रुपयांची कमाई केली आहे. अहान शेट्टी आणि तारा सुतारिया यांनी सिनेमात प्रमुख भूमिका साकारली.

चंदीगड करे आशिकी

 

अभिषेक कपूर दिग्दर्शित चंदीगड करे आशिकी हा सिनेमा १० डिसेंबरला रिलीज झाला. आयुषमान खुराना आणि वाणी कपूर यांची रोमँटीक लव्ह स्टोरी सिनेमात पहायला मिळाली. २०२१मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा पाचवा सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने एकूण ३१.८५ करोड रुपयांची कमाई केली.


हेही वाचा – Anushka Sharma : अनुष्काचं सिनेसृष्टीत कमबॅक, साइन केले ३ बिग बजेट सिनेमे

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -